व्हिक्स किंवा औषधं वापरण्याऐवजी सर्दीसाठी करा 'हा' नॅचरल उपाय, लहान मुलांनाही मिळेल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:28 PM2024-07-23T13:28:53+5:302024-07-23T13:30:54+5:30
Health Tips : सर्दी खोकल्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होते. सामान्यपणे काही लोक घरगुती उपाय करतात किंवा गोळ्या घेतात.
Health Tips : पावसाळा आला की, सर्दी खोकल्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होते. सामान्यपणे काही लोक घरगुती उपाय करतात किंवा गोळ्या घेतात.
जास्तीत जास्त लोक सर्दी झाली की, व्हिक्सचा वापर करतात. इतकंच नाही तर अनेकांना इनहेलर वापरण्याची सवय असते. पण याच्या वापराऐवजी तुम्ही एक खास नॅचरल उपाय करून तुमची सर्दी आणि खोकला दूर करू शकता. डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी एक व्हिडीओ शेअर करून खास उपाय सांगितला आहे.
पावसाच्या दिवसात वातावरण सतत बदलत असतं. कधी पाऊस तर कधी उन्ह तर कधी ढगाळ वातावरण असतं. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा बसणे अशा समस्या सगळ्यांना होतात. या समस्या कॉमन आहेत. पण यावर औषध घेण्याऐवजी तुम्ही एक खास नॅचरल उपाय करू शकता. तोही सोपा आहे.
श्वेता पांचाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, ओवा, लवंग आणि कापूर घ्या. एका तव्यावर या गोष्टी कमी आसेवर गरम करा. गरम झालेल्या गोष्टी एका कॉटनच्या कापडामध्ये बांधा. याचा वास किंवा रात्री झोपताना लहान मुलांच्या उशीखाली ठेवा. याने त्यांना आराम मिळेल आणि सर्दी-खोकलाही दूर होण्यास मदत मिळेल. या गोष्टी 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाजू नका.
ओवा खाण्याचे फायदे
1) ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
2) बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्याचा तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.
3) ओव्या वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.
4) ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
5) ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर अशतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.