INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2017 09:37 AM2017-04-06T09:37:51+5:302017-04-06T15:07:51+5:30

या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला जाणून घेऊया यामागचे गुपित !

INTERESTING: ... so Madhichand drink milk at night! | INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

googlenewsNext
ong>-Ravindra More
मधुचंद्राच्या रात्री नववधू आपल्या पतीला बदाम आणि केसरयुक्त दूध पिण्यास देते. तशी ही प्रथा पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतात ही प्रथा अजूनही सुरू आहे. अनेक चित्रपटांमध्येही हे सिन दाखविले जाते. मात्र या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला आज आपण यामागचे गुपित जाणून घेऊया.
मधुचंद्राच्या रात्री दूध पिण्याला खूपच महत्व आहे. नवविवाहीत जोड्यांसाठी साधे दूध दिले जात नाही तर ते खास प्रकारे तयार करुन दिले जाते. या दुधात कित्येक प्रकारचे तत्व मिक्स करून तयार केलेले असते. दोघांसाठीही हे दूध गुणकारी असल्याचे मानले जाते.
या दुधामध्ये केसर, हळद, साखर, बदाम, सोप, काळे मिरे आणि काजू मिक्स केले जातात. मग हे दूध उकळून त्यांना पिण्यास दिले जाते. हे आरोग्यासाठी अधिक गुणकारी असते.
लग्नाच्या पहिल्या रात्री दिल्या जाणाऱ्या दुधात काळे मिरे आणि बदाम मिक्स केलेले असतात. जेव्हा दुधाला उकळले जाते तेव्हा त्यातून असे काही तत्वे निघतात ज्याने शारिरीक संबंधाची इच्छा आणखी वाढवतात. यामुळे पहिल्या रात्रीपासूनच नवदाम्पत्याचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होते.
पूर्वी आणि काही प्रमाणात सध्याही नवविवाहीत जोडपी एकमेकांना जास्त ओळखत नसतात. मात्र याला लव्हमॅरेज आणि काही विवाह अपवाद आहेत. एकमेंकासाठी अनोख्या असेलल्या व्यक्ती नवीन जीवनाची सुरुवात करत असतात. मग अशा वेळी दुधाच्या बहाण्याने संवादाला सुरुवात होते. शिवाय एकाच ग्लासने दूध पिल्याने प्रेम वाढते असेही मानले जाते. यामुळे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी याला अधिक महत्व दिले जाते.
हळद, काळे मिरे आणि सोपयुक्त दुधाचे अनेक फायदे असतात. प्रथमच शारीरिक संबंध ठेवतात एखाद्याला संसर्ग किंवा इतर त्रास होण्याची होण्याची शक्यता असते. या समस्यांवर हे दूध चांगलेच गुणकारी ठरते. 

Web Title: INTERESTING: ... so Madhichand drink milk at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.