हृदयाबद्दल 'अशा' इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील, वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:09 PM2020-02-13T16:09:47+5:302020-02-13T16:10:57+5:30
हृदय हा शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव असतो.
हृदय हा शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव असतो. पण रोज अनेक चुकीच्या गोष्टी आपण वारंवार करत असतो. त्यामुळे हृदयाला धोका सुद्धा असू शकतो. आज आम्ही तुम्हाला हृदयाशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी.
हृद्याचे ठोके किती वेळा होतात
(image credit-gfycat)
जन्म झाल्यानंतर मृत्यू होईपर्यंत हृद्याचे ठोके सुरू असतात. आपल्या हृदयात ४ चेंबर असतात. त्यावर ४ वॉल्व असतात. हे वॉल्वज उघडतात आणि बंद होतात. जेव्हा या वॉल्वसची उघड झाप होत असते. त्यावेळी तेव्हा हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत असतो. एका मिनिटात ७२ वेळा हृदयाचे ठोके होत असतात. तसं पाहायला गेलं तर रोजचं जीवन जगताना दिवसात १ लाखापेक्षा अधिक वेळा हद्याचे ठोके होत असतात.
किती ब्लड पंप होतं
(image credit- ashok sahani)
तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण तुमचं हृदय तुमची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन एका मिनिटात ५ ते ३ लिटरपर्यंत ब्लड पंप होत असतं. यानुसार दिवसातून ७५०० लिटर पेक्षा जास्त रक्त तुमच्या हृद्याद्वारे पंप केलं जातं. हृद्याच्या पंप होण्याच्या क्रियेमुळे आपण जिवंत असतो. पंप केल्या जात असलेल्या रक्तात पोषक तत्व आणि ऑक्सीजन मिसळलेला असतो. जे सेल्सकडे जातं. त्यानंतर उरलेले घटक किडनीकडे पाठवले जातात. ज्या ठिकाणीहून रक्त फिल्टर होत असतं. ( हे पण वाचा-पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम)
हृदय एकटं सुद्धा जीवंत राहू शकंत
(image credit- pinterest)
ही खूप मजेशीर गोष्ट आहे पण तुमच्या हृदयाला शरीरापासून वेगळं केलं तर शरीराचं कार्य थांबेल आणि तुमचा मृत्यू होईल. पण हृदयाला जर तुमच्या शरीरापासून लांब केलं तरी सुद्धा त्याचे ठोके सुरूच राहतील. जगातील सर्वाधीक लोक कार्डीओवॅस्कुलर आजारांनी मरतात. त्यात सगळ्यात जास्त संख्या हार्ट अटॅक ने मृत्यू झालेल्या लोकांची आहे. वयस्कर व्यक्तीचे हार्ट २५० ते ३५० ग्रामचे असते. काही केसेस मध्ये हेच वजन ५०० ग्राम सुद्धा असू शकतं.
हसणं हृदयासाठी चांगलं असतं
(image credit-hydrusenglishcourse)
हृदयाला चांगलं ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला तुमचं हृदय चांगलं ठेवायचं असेल तर हसणं हा सुद्धा एका प्रकारचा व्यायाम आहे. एका अभ्यासानुसार हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह २० टक्क्यांनी वाढतो. हसल्यामुळे ताण-तणाव कमी होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ( हे पण वाचा-पायांची दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण आणि समस्या दूर करण्याचे योग्य उपाय!)