चॉकलेट आणि चीज योग्य प्रमाणात घेतल्यास कमी होतो हृदयरोगाचा धोका; इटलीच्या संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:10 PM2021-08-20T15:10:15+5:302021-08-20T15:10:26+5:30
संशोधनकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट, चीज आणि योगर्ट यांचा योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा दावा इटलीच्या नेपल्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.
हृदयाचे (heart)आरोग्य जपण्यासाठी डॉक्टर व्यायामासोबतच हेल्दी डाएटचा (healthy diet) सल्ला देतात. दरम्यान, संशोधनकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट, चीज आणि योगर्ट यांचा योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा दावा इटलीच्या नेपल्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांचे म्हणने आहे की दररोज तुम्ही जर २०० ग्रॅम डेरी प्रोडक्ट घेतले तर यामुळे हृदयाला काहीही अपाय होत नाही. जर तुम्हाला चीज खायला आवडत असेल तर एक तृतियांश कप चीज खाऊ शकता. ५० ग्रॅम चीज खाल्ल्याने हृदय हेल्दी राहते.
संशोधकांचे असेही म्हणणे आहे की चॉकलेटचे जर एका विशिष्ट प्रमाणात सेवन केले तर हृदयरोगाचा धोका कमी होतो. तुम्ही २द ते ४५ ग्रॅम चॉकलेट खाल्ले तर फायदा होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लेवेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स हदयाचे स्वास्थ्य चांगले ठेवतात. हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी दोन उपाय जे तुम्ही करू शकता.
१. उत्तम आहार: पालेभाज्यांमुळे १६ टक्के आणि तृणधान्यांमुळे २२ टक्के धोका कमी.
नॅशनल इस्टिट्युट ऑफ मेडिसिनच्या नुसार पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के आणि नायट्रेट्स असतात. जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात. जेवणात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे हृदयासंबधित आजारांचा धोका १६ टक्क्यांपर्यंत कमी होतो. तृणधान्यांमध्ये फायबर असते जे बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. दररोज जर १५० ग्रॅम तृणधान्यांचे सेवन केले तर धोका २२ टक्क्यांनी कमी होतो.
२. एक्सरसाईज : ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि कॉलेस्ट्रॉल कमी करते.
रेझिस्टंन्स ट्रेनिंग
अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिच्या मते, आठवड्यातून कमीत कमी सलग दोन दिवस रेझिस्टंन्स ट्रेनिंग जसे वेट उचलणे, रेझिस्टंन्स बँड ने किंवा बॉडी वेट एक्सरसाईजने पुशअप, चीनअप ने बॅली फॅट आणि बॉडी फॅट कमी होते. हे फॅट्स हृदयरोगाला कारणीभूत असतात. तसेच कॉलेस्ट्रॉलही कमी होते.