वैज्ञानिकांचा दावा: ५० टक्क्यापर्यंत लठ्ठपणा आणि ९० टक्क्यापर्यंत डिप्रेशनचा धोका कमी करते गाढ झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:48 PM2021-08-10T14:48:38+5:302021-08-10T19:39:18+5:30

स्लीप फाऊंडेशन नुसार मोबाईल , कम्प्युटरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉर्ट-वेवलेंथ प्रकाश उत्सर्जित करतात. ही ब्लु लाईट संध्याकाळच्या वेळी झोप येण्यासाठी गरजेचे असणाऱ्या मेलाटोनिन हार्मोमला कमी करते. ही स्लो वेव्स आणि REM च्या काळालाही कमी करते.

international study deep sleep reduces obesity by 50 percent and depression by 90 percent know what to do for good sleep | वैज्ञानिकांचा दावा: ५० टक्क्यापर्यंत लठ्ठपणा आणि ९० टक्क्यापर्यंत डिप्रेशनचा धोका कमी करते गाढ झोप

वैज्ञानिकांचा दावा: ५० टक्क्यापर्यंत लठ्ठपणा आणि ९० टक्क्यापर्यंत डिप्रेशनचा धोका कमी करते गाढ झोप

Next

पुर्ण झोप (sleep) अत्यंत गरजेची आहे. विशेष करून गाढ झोप. ही आपल्या शरिराला आपली शारीरीक यंत्रणा दुरुस्त करण्याची शक्ती (power) देते. पुरेश्या झोपेमुळे लठ्ठपणा, हृदयरोग आदी आजारांपासूनच बचाव होत नाही तर तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा त्यातूनही लवकर बरे होता. झोपेच्या चार अवस्था असतात. त्यातील सर्वात महत्त्वाची असते ती रॅपिड आय मुवमेंट REM. या अवस्थेत आपल्याला स्वप्न पडतात. तसेच ही अवस्था आपल्या शरीराला सर्वात जास्त फायदेशीर असते. जर तुम्ही ८ तास झोपत असाल तर यातील २० टक्के म्हणजेच ९६ मिनिटांची सर्वात गाढ झोप म्हणजे REM सर्वात जास्त गरजेची आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ. जॉय डी देसाई यांनी गाढ झोपेच्या चार अवस्थांची माहिती दिलेली आहे.

स्लीप फाऊंडेशन नुसार मोबाईल , कम्प्युटरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉर्ट-वेवलेंथ प्रकाश उत्सर्जित करतात. ही ब्लु लाईट संध्याकाळच्या वेळी झोप येण्यासाठी गरजेचे असणाऱ्या मेलाटोनिन हार्मोमला कमी करते. ही स्लो वेव्स आणि REM च्या काळालाही कमी करते.

यापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुढील उपाय तुम्ही करू शकता. त्यासाठी एखादी आरामदायक जागा निवडा. तिथे झोपा. जिभ टाळ्याला लावा आणि तोंडातून शिटीसारखा आवाज काढुन तोंडाने श्वास घेत हवा बाहेर काढा. आता तोंड बंद करा व मनात हळूहळू ४ अंक मोजत श्वास आत घ्या. सात सेकंद श्वास रोखुन धरा. नंतर ८ सेकंदात पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे आवाज करत तोंडाने श्वास बाहेर काढा.

झोपेचे ४ चक्र, शेवटचे २ चक्र शरीराच्या रिकव्हरिसाठी गरजेचे

पहिले चक्र: नॉन रॅपिड आय मूवमेंट म्हणजेच NREM स्टेज १- तुम्ही झोपल्यानंतर ही अवस्था सुरु होते. ती जवळजवळ २० मिनिटे असते.

दुसरे चक्र: NREM स्टेज २- झोपेचा हा काळ रात्रीच्या पुर्ण झोपेच्या ५० टक्के असतो. या अवस्थेते मेंदु स्लो व्हेव्ज किंवा डेल्टा तरंग प्रवाहित करते.

तिसरे चक्र: NREM स्टेज ३-  झोपेच्या या अवस्थेला गाढ झोप म्हटले जाते. शरीराच्या रिकव्हरी आणि विकासासाठी ही अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.

चौथे चक्र: रॅपिड आय मूवमेंट म्हणजेच REM- झोपेच्या या अवस्थेमध्ये सर्व स्नायू व पेशी रिलॅक्स झालेले असतात. श्वासोच्छवास अनियमित होतो व स्वप्न पडायला सुरुवात होते. हे आपल्या झोपेचे सर्वात शेवटचे व महत्वाचे चक्र असते.

Web Title: international study deep sleep reduces obesity by 50 percent and depression by 90 percent know what to do for good sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.