International Yoga Day 2018 : ही पाच आसनं करा आणि चिरतरुण राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 01:09 PM2018-06-20T13:09:02+5:302018-06-20T13:22:22+5:30

दैनंदिन जीवनातील अनैसर्गिक प्रक्रियांमुळे अकाली किंवा लवकर वृद्धत्व येते.

International Yoga Day 2018: 5 yoga asanas to prevent premature ageing and keep you young | International Yoga Day 2018 : ही पाच आसनं करा आणि चिरतरुण राहा

International Yoga Day 2018 : ही पाच आसनं करा आणि चिरतरुण राहा

Next

मुंबई - सदैव चिरतरुण राहावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण वृद्धापकाळ हा आयुष्याचाच एक भाग असतो आणि आयुष्यातील या टप्प्याकडे ठरवूनही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र अकाली येणाऱ्या वृद्धत्वाचा सामना करणं अत्यंत क्लेशदायक असते. दैनंदिन जीवनातील अनैसर्गिक प्रक्रियांमुळे अकाली किंवा लवकर वृद्धत्व येते. जीवनशैली, शारीरिक समस्या, नैराश्य, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे या समस्या उद्धभवतात.  सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे, त्वचा कोरडी होणे आणि संवेदनशील त्वचा ही अकाली वृद्धत्वाची लक्षणं आहेत. अकाली वृद्धत्वाची समस्या समूळ नष्ट करावयाची असल्यास योगसाधनेचा मार्ग अवलंबावा. नियमित योगाभ्यास केल्यास केवळ अकाली वृद्धत्वच नाही तर अन्य शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते. 

अकाली वृद्धत्वाची समस्या टाळण्यासाठी खालील दिलेल्या पाच योगाभ्यांसाचा अभ्यास करावा
1. सिंह मुद्रा  (Lion Pose)

ताणतणामुळे अनेकदा अतिरिक्त रक्तदाब (High Blood Pressuer ) किंवा अल्प रक्तदाब (Low Blood Pressuer ) हे दोष निर्माण होतात.  संतुलित रक्तदाब निर्माण करण्यास कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह यांची फार मदत होते. यामुळे सिंह मुद्रेचा नियमित अभ्यास केल्यास  कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह, थायरॉइड व पॅराथायरॉइड एन्डोक्रिनल ग्लँड्स यांचे स्वास्थ चांगले राहते. चेहऱ्याचा फुगीरपणा व फिकेपणा तसंच चेहऱ्याच्या त्वचेचा रुक्षपणा या मुद्रेच्या दीर्घ अभ्यासानं नाहीसा होतो.
संकेत - जबड्यातील वेदना, सूज असल्यास सिंह मुद्रेचा अभ्यास करू नये.

International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

2. मत्स्यासन (Fish Pose)
मत्स्यासनाचा नियमित अभ्यास केल्यास हनुवटीखालील ताणरहित स्नायूंची अतिरिक्त वाढ (Double Chin) नाहीशी होते. छातीचे स्नायू ताण मिळाल्यामुळे अधिक लवचिक बनतात व छातीचा पिंजरा अधिक कार्यक्षम बनतो. यामुळे श्वसनक्षमता वाढते.  मानेचे स्नायू सुदृढ व गळ्याचे स्नायूचे लवचिक बनतात. मानदुखीची समस्यादेखील कमी होते.
संकेत - मानेचे कोणत्याही प्रकारचे दोष, गळ्यामध्ये सूज असल्यास मत्स्यासन करणं टाळावे.   

3. हस्तपादासन (Standing Forward Bend)
तरुण राहण्यासाठी मदत करणाऱ्या आसनांमध्ये हस्तपादासनाचाही समावेश आहे. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे कण्यातील किरकोळ दोष नाहीसे होतात. तेथील रक्ताभिसरण सुधारते. पोटावर विशेषतः ओटीपोटावर धन दाब (Positive Pressure ) निर्माण झाल्यानं तेथील चरबी कमी होते. 
संकेत - तीव्र पाठदुखी, कंबरदुखी असल्यास हस्तपादासनाचा अभ्यास करणं टाळावं. 

4. वीरभद्रासन (Warrior Pose)
वीरभद्रासनामुळे छाती, फुफ्फुसे, खांदे, मान, पोट आणि मांड्यांवर ताण येतो. यामुळे खांदे, पाठ आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.  

5. ब्रह्ममुद्रा 
रक्तदाब व हृदयस्पंदन नियंत्रित करण्यास मदत करणारे कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह ही अंग तसंच व्यक्तिमत्त्वावर बरा-वाईट परिणाम करणाऱ्या कंठग्रंथी (Thyroid and Parathyroid Endocrine Glands), स्वरयंत्र इत्यादी महत्त्वांची अंगे आहेत. ब्रह्ममुद्रेचा अभ्यास केल्यानं या भागांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.  यामुळे मान दृढ व लवचिक होते. मान व गळा यांतील रक्तसंचय नष्ट होतो. 
संकेत - मानेचे गंभीर आजार, ताठर मान असल्यास ब्रह्ममुद्रेचा अभ्यास करू नये.  

Web Title: International Yoga Day 2018: 5 yoga asanas to prevent premature ageing and keep you young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.