International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:28 AM2018-06-21T11:28:05+5:302018-06-21T11:28:05+5:30
एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, ती 15 वर्षांपासून योगाभ्यास करते. चला जाणून घेऊन तिच्या फिट फिगरचं गुपित....
मुंबई : शिल्पा शेट्टी भलेही आता सिनेमात काम करत नसली तरी ती तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत असते. आता ती एक फिटनेस ट्रेनर म्हणूनही लोकप्रिय झाली आहे. 43 वर्षीय शिल्पा योगाभ्यास करूनच आज इतकी फिट आणि हेल्दी दिसते. एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, ती 15 वर्षांपासून योगाभ्यास करते. चला जाणून घेऊन तिच्या फिट फिगरचं गुपित....
आज जागतिक योग दिवस आहे. पण काही कामानिमित्त शिल्पा लंडनमध्ये आहे. मात्र नियमित योगाभ्यास करणे शिल्पाच्या रूटीन लाईफचा भाग आहे.
शिल्पाने सांगितले की, 'मी सगळीच योगासने करण्याचा प्रयत्न करते. पण मला सर्वात जास्त अडचण शीर्षासन करण्याला आली. पण हळूहळू मी शिकत गेले आता मी शीर्षासन करु शकते'.
ती पुढे सांगते की, 'योगाभ्यासामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. जेव्हा आपण योगाभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपल्या शरीराची क्षमता किती आहे हे कळतं'.
ती सांगते की, 'अनेकांना योगाभ्सास करणे सर्वात कठीण काम वाटतं. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मानसिक रूपाने आत्मसात करता तेव्हा ती करण्यात काहीच अडचण येत नाही'.
कोणती आसनं सर्वात फायद्याची?
शिल्पा सांगते की, आपण आपल्या शरीराला स्ट्रेज नक्की करावं. याने तुमचं शरीर लवचिक होतं. त्यासोबतच ब्रीदिंग योगाभ्यास करावा. म्हणजे कपालभांती हा सर्वात चांगला योगाभ्यास आहे. हा योगाभ्यासाने मेंदुला ऑक्सिजन मिळतं. योगाभ्यासाची सुरुवात नेहमी सोप्या आसनानं करावी.