International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:56 AM2019-06-19T11:56:09+5:302019-06-19T11:57:29+5:30
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांना कोणतंही काम करताना त्रास होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना तुम्ही योगाभ्यास करून दूर करू शकता.
आपल्यापैकी अनेक जणींना याबाबत योग्य माहिती नसते. मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी मर्जरी आसन आणि वक्रासनाची मदत घेऊन दूर करू शकता. या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि क्रॅम्सचा वेदना दूर केल्या जाऊ शकतात.
(Image Credit : LopScoop)
मर्जरासन केल्याने मिळेल आराम
मर्जरासन करण्यासाठी सर्वात आधी गुडघ्यावर जमिनिवर बसा आणि आपले दोन्ही हात पुढे करून एखाद्या प्राण्याप्रमाणे उभे राहा. तुमचे हात आणि गुडघे एका सरळ रेषेमध्ये असणं आवश्यक आहे. तुमचे गुडघे एकत्र आणि त्यामध्ये थोडे अंतर असणं गरजेचं आहे. ही सुरुवातीची मुद्रा आहे. यानंतर श्वास घ्या आणि आपला चेहरा बाहेरच्या बाजूस घेऊन या. त्यानंतर श्वास सोडा आणि त्यानंतर तुमची हनुवटी छातीच्या दिशेला घेऊन जा. असं कमीत कमी 10 वेळा तरी करा.
फायदा
मासिक पाळीसंबंधातील सर्व समस्या आणि ल्यूकोरियाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी हे आसन केल्यामुळे आराम मिळतो. त्याचबरोबर हे या दिवसांत होणाऱ्या वेदना आणि क्रँम्प्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात.
वक्रासन देखील फायदेशीर
वक्रासन केल्यामुळे सर्वात आधी आपले पाय पसरून जमिनिवर बसून घ्या. त्यानंतर तुमचा उजवा पाय गुडघ्या दुमडून पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघअयाजवळ घेऊन जा. त्यानंतर श्वास घ्या आणि तुमचा डावा हात स्ट्रेच करा. श्वास सोडताना आपल्या डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन जा. त्यानंतर आपला उजवा हात मागे कंबरेवरती घेऊन जा. त्याचबरोबर आपल्या मानेलाही उजव्या बाजूला फिरवा. या मुद्रेमध्ये काही वेळ रहा आणि सामान्य श्वास घेत रहा. थोड्या वेळानंतर सामान्य मुद्रेमध्ये या. अशाचप्रकारे दुसऱ्या बाजूलाही करा.
फायदा
मासिक पाळीदरम्यान होणारं पाठ आणि कंबरेचं दुखणं दूर करण्यासाठी मदत करतं.
टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.