International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:06 AM2019-06-18T11:06:12+5:302019-06-18T11:08:10+5:30

लठ्ठपणाने हैराण लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. ज्यात डायबिटीस आणि हृदयरोगांचा अधिक धोका असतो.

International Yoga Day 2019 : Top 5 Yoga postures for weight loss | International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!

International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!

googlenewsNext

(Image Credit : Imperial College London)

आज वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या जगभरात वेगाने पसरत आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांना सुद्धा वजन वाढण्याची समस्या होऊ लागली आहे. तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे.

(Image Credit : Reader's Digest)

लठ्ठपणाने हैराण लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. ज्यात डायबिटीस आणि हृदयरोगांचा अधिक धोका असतो. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी फिटनेसकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही आसनं सांगत आहोत. ही आसने नियमितपणे करून तुम्ही वजन कमी करू शकता.

१) सूर्य नमस्कार

(Image Credit : readoo.in)

वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार फार प्रभावी असतो. यात १२ आसने असतात, ज्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो. सूर्य नमस्कार केल्याने मान, फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात. तसेच ही आसने नियमित केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी देखील नष्ट होते. त्यामुळे वजन कमी होतं.

२) भुजंगासन

(Image Credit : Finess Yoga)

हे आसन करून शरीरात ऑक्सिजन अधिक जातं. अर्थातच त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. हे आसम दिवसभरातून १० वेळा केलं जाऊ शकतं. या आसनामुळे कंबर आणि पोटाच्या खालच्या भागात जमा झालेली चरबी सुद्धा दूर केली जाऊ शकते.

३) धनुरासन

या आसनामुळे वजन कमी होण्यासोबतच मांड्या, छाती आणि स्तनातील अतिरिक्त चरबी सुद्धा दूर होते. या आसनाने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं वजन कमी करता येतं. हे आसन केल्याने पोटावर ताण येतो आणि लवचिकपण निर्माण होतो.

४) त्रिकोणासन

(Image Credit : FashionLady)

वेगवेगळे प्रयत्न करूनही तुम्ही जर वजन कमी करू शकले नसाल तर आता त्रिकोणासन करून बघा. हे आसन नियमितपणे केल्याने तुम्ही सहजपणे कॅलरी बर्न करू शकता. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जर हे आसन वेगाने केलं तर फायदा लवकर होतो.

५) वीरभद्रासन

(Image Credit : Yoga Journal)

हे आसन केल्याने मांड्या, पोट आणि स्तनांवरील चरबी कमी होते. इतकेच नाही तर यान शरीराची आतंरिक शक्तीही वाढते. ज्यामुळे तुम्हाला अधिक काळासाठी शक्ती मिळते. या आसनामुळे तुमचे हात, खांदेही मजबूत होतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर हे आसन नियमितपणे करा.

(टिप : वरील योगाभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच करावा. कारण योगाभ्यास करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. ते पाळले गेले नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.)

Web Title: International Yoga Day 2019 : Top 5 Yoga postures for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.