International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:48 AM2019-06-21T10:48:42+5:302019-06-21T10:57:40+5:30

आज आम्ही तुम्हाला काही अशा योगाभ्यासांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही  वेळीच वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करू शकता.

International Yoga Day 2019: Yoga help to reduces the risk of high blood pressure | International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! 

International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! 

googlenewsNext

आज आम्ही तुम्हाला काही अशा योगाभ्यासांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही  वेळीच वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करू शकता. अलिकडे सर्वात जास्त सामना करावी लागणारी समस्या म्हणजे हाय ब्लड प्रेशर. तुम्हालाही ब्लड प्रेशरच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर काही आसने करून तुम्ही ही समस्या दूर ठेवू शकता. चला जाणून अशाच काही आसनांबाबत...

ब्लड प्रेशरची समस्या ज्यांना पुन्हा पुन्हा होते, त्यांना ही समस्या कंट्रोल करणे फार कठीण जातं. पण जे लोक हायपरटेंशनचे रुग्ण होणार आहेत. म्हणजेच ज्यांना ब्लड प्रेशरचा धोका होण्याची लक्षणे दिसतात. ते यापासून त्यांचा बचाव करू शकतात.

आतापर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल की लाइफस्टाईल म्हणजेच जीवनशैलीमध्ये बदल करुन आणि व्यायाम करून हाय ब्लड प्रेशरपासून बचाव केला जाऊ शकतो. अशातच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जीवनशैलीत बदल करुन किंवा व्यायाम करुन या तुलनेत योगाभ्यास अधिक फायदेशीर ठरतो.

(Image Credit : The Residences at Historic Row)

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जे लोक हाय बीपी समस्येचे शिकार होणार होते. त्यांच्यात लाइफस्टाईलमध्ये बदल करण्यापेक्षाही अधिक नियमितपणे योग करण्याचा फायदा बघितला गेला.
प्री-हायपरटेंशन काय असतं?

(Image Credit : Freepik)

सामान्यपणे १२०/८० ब्लड प्रेशर नॉर्मल मानलं जातं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वरचा बीपी म्हणजेच सिस्टॉलिक १२० ते १३९ च्या आजूबाजूला राहू लागतो, तेव्हा प्री-हायपरटेंशनची स्थिती मानली जाते. जर ही स्थिती व्यवस्थित सांभाळली गेली नाही तर हाय ब्लड प्रेशर काही काळाने होऊ शकतं. हाय बीपी रुग्णांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो.

योगा करणाऱ्यांवर बीपीचा प्रभाव 

(Image Credit : Video Blocks)

प्री-हायपरटेंशनच्या १२० रूग्णांच्या २ ग्रुपवर रिसर्च करण्यात आला. ज्या रुग्णांनी नियमितपणे योगाभ्यास केला, त्यांचा बीपी 4 mmHg पर्यंत कमी झाला होता.

ही आसने फायदेशीर

(Image Credit :Freepik)

रिसर्च दरम्यान लोकांना वार्मअपनंतर सूर्य नमस्कार, वज्रासन, ताडासन, शशकासन इत्यादी करण्यास सांगण्यात आले. नंतर प्राणायाममध्ये अनुलोम विलोम केला. तसेच आरामासाठी नंतर कायोत्सर्ग करून घेतला. मेडिटेशनसाटी प्रेक्षा ध्यानाचं ट्रेनिंग देण्यात आलं. हे सगळं सहा महिने केल्यानंतर रुग्णांमध्ये बराच फायदा दिसून आला. जर तुम्हालाही योगाभ्यासाचे फायदे लक्षात आले असतील तर लगेच नियमित योगाभ्यास करा.

Web Title: International Yoga Day 2019: Yoga help to reduces the risk of high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.