International Yoga Day: इम्युनिटी बुस्टर आहेत 'ही' योगासने, सर्व चिंता करतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:02 PM2021-06-18T22:02:34+5:302021-06-18T22:04:19+5:30

आम्ही तुम्हाला अशी काही आसनांची माहिती सांगणार आहोत जी कोविडच्या या काळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

International Yoga Day: Immunity boosters are 'this' yoga, all worries will go away | International Yoga Day: इम्युनिटी बुस्टर आहेत 'ही' योगासने, सर्व चिंता करतील दूर

International Yoga Day: इम्युनिटी बुस्टर आहेत 'ही' योगासने, सर्व चिंता करतील दूर

googlenewsNext

कोरोना वायरस संक्रमण काळात अनेकांना कोरोना झाला. त्यातून काही यशस्वीरित्या बरेही झाले. तुम्हाला जर कोरोना होऊन गेला असेल आणि ज्यांना कोरोना नाही त्यांना तो न व्हावा असं वाटत असेल तर ही योगाशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही.  आम्ही तुम्हाला अशी काही आसनांची माहिती सांगणार आहोत जी कोविडच्या या काळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.


बालासन
हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आसन आहे. हे आसन पाठीचे स्नायु मोकळे करतं आणि ताण हलका करतं. स्नायुंना आराम देत आणि उर्जा उत्पन्न करतं.

अनुवित्सासन
फुफ्फुस बळकट करण्यासाठी हे महत्वाचे आसन आहे. यामुळे श्वासोच्छवासाची क्रिया सुलभ होते. त्यात काही अडथळा येत नाही. यामुळे शरीर डिटॉक्स व्हायलाही मदत होते.


प्राणायाम
दिर्घ श्वासोच्छवासामुळे चिंता आणि तणाव हलका होण्यास मदत करते. ज्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेनची समस्या आहे त्यांच्यासाठी हे आसन म्हणजे वरदान आहे.


धनुरासन
या आसनामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो. त्याचबरोबर तुमची चयापचय प्रक्रिया सुधारते. पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी हे उत्तम आसन आहे.


भुजंगासन
या आसनाचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे लीव्हरवर येणारा ताणही कमी होतो. त्याचबरोबर पाचनक्रियाही सुधारते.

Web Title: International Yoga Day: Immunity boosters are 'this' yoga, all worries will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.