International Yoga day: उपाशीपोटी योगा करावा का? असे प्रश्न पडत असतील तर जाणून घ्या योगा करण्याचे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:03 PM2021-06-21T15:03:24+5:302021-06-21T15:05:17+5:30
केवळ योग दिनापुरतेच नाही तर दररोज योगा करणारे कितीतरीजण आहेत. योगाचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील पण योगा करतानाचे नियम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का?
आजच्या आतंराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण योगासनांबद्दल सर्व बाजूंनी जागृत होत असाल. योगा का करावा ते योग्य आसने आदि सर्व गोष्टींची माहिती तुम्ही घेत असाल. केवळ योग दिनापुरतेच नाही तर दररोज योगा करणारे कितीतरीजण आहेत. योगाचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील पण योगा करतानाचे नियम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? चला जाणून घेऊया.
उपाशीपोटी योगा करावा का?
पहाटे काहीही खाता व न पिता योगासन करणे हे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. काही खाल्ल्यानंतर योगा करू नये मग ती सकाळ असो अथवा दुपार किंवा रात्र. खाल्ल्यानंतर योगा करणे टाळावे.
योगा करण्यापुर्वी तुम्ही काय खाऊ शकता?
जर तुम्हाला सकाळीच उठल्यावर चहा प्यायची तल्लफ होत असेल तर तुम्ही चहा पिऊ शकता. तुम्हाला जर काही खायचेच असेल तर योगा करण्याच्या दोन ते तीन तास आधी दलिया किंवा ओट्स खाऊ शकता. योगा करण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही फळांचा रस किंवा ग्लुकोजही पिऊ शकता.
योगा कोणत्या वेळी करावा?
जर तुम्हाला सकाळी योगा करायला वेळ नाही मिळाला तर तुम्ही दुपारी योगा करू शकता. पण एक लक्षात ठेवा, दुपारी जेवल्यानंतर तीन तासानंतरच तुम्ही योगा करू शकता. तुम्हाला जर रात्री योगा करायचा असेल तर जेवण्यापुर्वी अर्धा तास आधी योगा करावा. योगा करताना तुमचे पोट भरलेले असू नये.