IRDAI Advisory: सावधान! हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा काढलाय? पैसे बुडतील, IRDAI ने नाव घेत दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:02 PM2022-04-15T17:02:00+5:302022-04-15T17:03:59+5:30

IRDAI Health Insurance Advisory For Even Healthcare : सध्या डिजिटली पॉलिसी देणारे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आपल्याला त्याचे ज्ञान नसते व मिळेल त्या कंपनीकडून मिळेल ती पॉलिसी काढली जाते. यामुळे इरडाने ती कंपनी अधिकृत आहे की नाही, तो एजंट अधिकृत आहे की नाही हे तपासूनच मग पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

IRDAI Health Insurance Advisory For Even Healthcare; Its a Fraud Company, your Money will sink, IRDAI warned | IRDAI Advisory: सावधान! हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा काढलाय? पैसे बुडतील, IRDAI ने नाव घेत दिला इशारा

IRDAI Advisory: सावधान! हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा काढलाय? पैसे बुडतील, IRDAI ने नाव घेत दिला इशारा

googlenewsNext

कोरोना महामारीनंतर हेल्थ इंन्शुरन्स कंपन्यांचा आणि पॉलिसींचा सुळसुळाट झाला आहे. जो तो एजन्ट बनला आहे. आरोग्याचा खर्च वाढण्याच्या भीतीने जो तो आरोग्य विमा घेण्याच्या मागे लागला आहे. अशातच काही कंपन्या ग्राहकांना फसवू लागल्या आहेत. यावर विमा रेग्युलेटर आयआरडीएआयने एका कंपनीचे थेट नाव घेत लोकांना सावध केले आहे. 

या कंपनीतून तुम्ही आरोग्य विमा घेतला असेल तर तुमचे पैसे बुडणार आहेत. सुरुवातीला मोठ्या शहरांमध्येच आरोग्य विमा घेणारे होते, आता छोट्या छोट्या शहरांमध्येही आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे याचा फायदा काही कंपन्या उठवू लागल्या आहेत. आरोग्य विमा हा चांगला असतो, कारण ऐन गरजेच्या वेळी तो आपल्या जवळच्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडतो. 

काही कंपन्या चुकीच्या पद्धतीने प्लॅन विकत आहेत. यामुळे तुमचे पैसे बुडू शकतात, तसेच हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्चही ऐनवेळी तुमच्यावरच पडू शकतो. हेल्थ इंन्शुरन्स खरेदी करणाऱ्यांसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने एक सूचना जारी केली आहे. 

सध्या डिजिटली पॉलिसी देणारे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आपल्याला त्याचे ज्ञान नसते व मिळेल त्या कंपनीकडून मिळेल ती पॉलिसी काढली जाते. यामुळे इरडाने ती कंपनी अधिकृत आहे की नाही, तो एजंट अधिकृत आहे की नाही हे तपासूनच मग पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

कोणती कंपनी...
१३ एप्रिलला इरडाने इव्हन हेल्थकेअर प्रा. लि. कंपनीबाबत(Even Healthcare Pvt Ltd)  लोकांना सावध केले आहे. ही अनधिकृत कंपनी असल्याचे इरडाने म्हटले आहे. https://even.in वरून पॉलिसी घेणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते, असे इरडाने म्हटले आहे. 

Web Title: IRDAI Health Insurance Advisory For Even Healthcare; Its a Fraud Company, your Money will sink, IRDAI warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य