सकाळी नाश्ता न करण्याचे गंभीर नुकसान, वाचाल तर कधीच टाळणार नाही सकाळचा नाश्ता....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:16 AM2024-08-19T10:16:43+5:302024-08-19T10:18:40+5:30
Iron Deficiency Causes: आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज असते. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही सामान्य चुकांबाबत सांगणार आहोत ज्यामुळे शरीरात आयर्न कमी होतं.
Iron Deficiency Causes: शरीरात आयर्नची कमतरता ही एक कॉमन समस्या आहे. अनेकांना ही समस्या होते. पण ही समस्या झाली तर शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की, सतत थकवा, कमजोरी आणि श्वास घेण्यास त्रास. आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज असते. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही सामान्य चुकांबाबत सांगणार आहोत ज्यामुळे शरीरात आयर्न कमी होतं.
नाश्ता न करणे
अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक रोज सकाळी नाश्ता करत नाहीत, त्यांना शरीरात आयर्न कमी होण्याची समस्या होण्याचा धोका अधिक असतो.
आहारात आयर्न फूड्सची कमतरता
एका संतुलित आहारामुळे शरीरात आयर्नचं प्रमाण कायम राहतं. ज्यात हिरव्या पालेभाज्या, बीन्स, चिकन, दाणे यांचा समावेश आहे. यांचं नियमित सेवन केल्याने शरीरात आयर्नचं प्रमाण योग्य राहतं.
कॉफी आणि चहाचं जास्त सेवन
कॉफी आणि चहामध्ये टॅनिन नावाचं एक तत्व असतं. जे आयर्नच्या अवशोषणात अडथळा आणतं. त्यामुळे जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन केल्याने शरीरात आयर्न कमी होऊ शकतं.
जास्त कॅल्शिअम
दूध, पनीर आणि दही यांचं अधिक सेवन केल्याने आयर्नचं अवशोषण प्रभावित होतं. त्यामुळे या पदार्थांचं सेवन खूप जास्त करू नये.
आतड्यांची काळजी न घेणे
गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये प्रकाशित शोधानुसार गॅस्ट्रोइंटेस्टायनल आरोग्य आणि पोषक तत्वाचं अवशोषण यात संबंध आहे. रिसर्चनुसार, ज्या व्यक्तींच्या आतड्यांचं आरोग्य बिघडलेलं आहे त्यांच्या आयर्नची कमतरता झाल्यावर एनीमिया विकसित होण्याचा धोका अधिक असतो.