'हे' तत्व शरीरात कमी झालं तर कमी होईल रक्त, ठप्प पडतील फुप्फुसं; लगेच करा हे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:07 PM2024-02-28T14:07:35+5:302024-02-28T14:52:41+5:30
जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन शरीरात फुप्फुसांपासून सगळीकडे पोहोचण्याचं काम रक्त करतं, ज्यात हीमोग्लोबिन असतं.
अनेक फळं अशी असतात ज्यात आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व भरपूर असतात. ज्यामुळे रक्तात हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत मिळू शकते. अशाच काही फळांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
हीमोग्लोबिन वाढवण्याचे उपाय
जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन शरीरात फुप्फुसांपासून सगळीकडे पोहोचण्याचं काम रक्त करतं, ज्यात हीमोग्लोबिन असतं. हीमोग्लोबिनमध्ये आयर्न असतं. हीमोग्लोबिनचं शरीरात कमी झालं तर रक्तही कमी होतं आणि श्वास घेण्याची समस्या होते. अशात काही फळांचं सेवन करून तुम्ही हीमोग्लोबिन वाढवू शकता.
सफरचंद
सफरचंदात आयर्न आणि इतर आवश्यक पोषक तत्व भरपूर असतात जे लाल रक्त कोशिका आणि हीमोग्लोबनची निर्मिती करण्यास मदत करतात.
डाळिंब
डाळिंबामध्येही भरपूर प्रमाणात आयर्न असतं. जे हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या दूर होण्यास मदत मिळते.
केळी
केळीमध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी6 भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.
कलिंगड
कलिंगडात आयर्न आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे आयर्नचं अवशोषण करण्यास मदत करतं आणि हीमोग्लोबिन वाढवण्यासही मदत करतं.