अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त आहात?; 'हे' उपाय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:58 PM2019-02-26T19:58:09+5:302019-02-26T20:00:29+5:30
साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते.
साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते. यामागे बिघडलेली लाइफस्टाइल, असंतुलित आहार आणि तणाव यांसारखी अनेक कारणं असू शकतात. पण जर मासिक पाळी अनियमित असेल तर ताण आणखी वाढतो. तसेच अनेकदा अस्वस्थ वाटू लागतं. अनेकदा डॉक्टर यावर औषधंही देत नाहीत. त्यामुळे आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची मासिक पाळीमध्ये उद्भवणारी अनियमिततेची समस्या दूर होऊ शकते.
ही असू शकतात कारणं
महिलांमध्ये मासिक पाळी किंवा पिरियड्स अनियमित होणं ही एक नॉर्मल समस्या आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. धकाधकीचं दिनक्रम, असंतुलित आहार, अनिमिया, (anemia), मेनोपोज, वजन जास्त वाढणं किंवा घटनं, शरीरात होणारे हार्मोन चेंजेस इत्यादी. त्याचबरोबर मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि मोनोपॉजच्या आधी हार्मोनसंबंधिच्या समस्यांमुळेही मासिक पाळीमध्ये अनियमिततेची समस्या उद्भवते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक औषधं बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्याऐवजी घरगुती उपचार कधीही फायदेशीर ठरतात.
हे घरगुती उपाय फायदेशीर
आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. जेणेकरून तुम्हाला योग्य परिस्थितीचा अंदाज येण्यास मदत होइल.
तीळ आणि गुळ
गुळाला आयर्नचा उत्तम स्त्रोत मानलं जातं आणि तीळामध्ये लिग्नान (lignin) सोबतच शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असतात. जे हार्मोनसंबंधी कोणतीही समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. परिणामी मासिक पाळी वेळेत येण्यास मदत होते. यासाठी एक मुठभर तीळ भाजून घ्या. त्यानंतर एक चमचा गुळासोबत बारिक करून घ्या. त्यानंतर मासिक पाळीच्या येण्याच्या दोन आठवड्यांआधी या मिश्रणाचे अनोशापोटी सेवन करा. काही महिने असं करा. फक्त गुळाच्या सेवनानेही अनियमित मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या मिश्रणाचे सेवन मासिक पाळीदरम्यान करणं टाळा.
हळदही उपयोगी
हळदीचा समावेश प्रामुख्याने मसाल्याच्या पदार्थांमध्ये करण्यात येतो. पण हिच हळद मासिक पाळीमध्ये उद्भवणारी अनियमिततेची समस्या दूर करण्यासाठीही मदत करते. एवढचं नाही तर शरीरामध्ये होणारे हार्मोन चेंजेस दूर करण्यासाठीही हळदीचा उपयोग होतो. हळदीचा इमानेगोज (emmenagogue ) गुणधर्म मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच हळदीचे अॅन्टी-इन्फ्लेमटोरी गुणधर्म मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठीही मदत करतात. यासाठी एक ग्लास दूधामध्ये चिमूटभर हळद एकत्र करा. त्यामध्ये चवीसाठी थोडीशी मध किंवा गुळ एकत्र करा. मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होइपर्यंत या दूधाचेसेवन करा. मासिक पाळीच्या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी फायदा होइल.