Heart Disease: वेळीच सावध व्हा! तुमच्या आहारातला 'हा' पदार्थ वाढवतोय Heart Attackचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:25 PM2023-03-01T16:25:18+5:302023-03-01T16:25:44+5:30
हल्ली तरूणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय.. त्यावरही वाचा तज्ञ्जांचे मत
Erythritol and heart disease: लोक आपल्या फिटनेसबद्दल हल्ली प्रचंड जागरूक असतात. त्यामुळेच अनेक लोक साखर खाणे टाळतात आणि त्याऐवजी आर्टिफिशल स्वीटनरचा वापर करतात. हे स्वीटनर साखरेपेक्षाही गोड असतात. याच्या वापराने वजनही वाढत नाही तसेच त्यात कॅलरीही कमी असतात. त्यामुळे मधुमेह (डायबिटीज) असणारे बरेचसे लोक या स्वीटनरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पण एका रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की हे स्वीटनर तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक असू शकतात.
काय सांगतो अभ्यास?
क्लीवलैंड क्लिनिक लर्नर रिसर्च इंस्टीट्यूटच्या अभ्यासात दावा करण्यात आलाय की, आर्टिफिशियल स्वीटनर एरिथ्रीटोलमुळे हृदयविकाराचा धोका संभवतो. तसेच शरीरात रक्ताच्या गाठी होऊन शकतात त्यामुळे हार्ट अटॅकचा जास्त धोका उद्भवतो. पण खरंच असं आहे का? आर्टिफिशियल स्वीटनर आरोग्यासाठी वाईट आहेत का? याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊया.
तज्ज्ञ काय सांगतात?
कैलाश रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कुमार अग्रवाल यांच्या मते, एरिथ्रिटॉल आर्टिफिशियल स्वीटनर मधुमेहाच्या रुग्णांसाठी आधीपासूनच वापरात आहे आणि त्याला WHO ने मान्यता दिली आहे. कृत्रिम एरिथ्रिटॉल शरीरात शोषले जाते आणि मूत्राद्वारे देखील उत्सर्जित होते. एरिथ्रिटॉल न घेतलेल्या लोकांमध्ये, 2 पट जास्त इलेक्ट्रोलाइट आढळले आहेत, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची संख्या वाढली आहे. जर आपण त्याचा नियमित वापर केला तर त्याचा धोका असतो. ते मर्यादेत वापरावे लागते.
तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले
पूर्वी ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत असे, पण आता तरुणांनाही हृदयविकार होत आहेत. हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे लोक चुकीच्या पद्धतीने आहार घेत आहेत. तसेच तरूण पिढीत अतिधूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयविकार होत असल्याचे दिसून आले आहे.