जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतं आयुर्वेद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:02 AM2023-07-15T10:02:06+5:302023-07-15T10:02:28+5:30

Bathing After Meal : फक्त चांगला आहार घेणं इतकंच महत्वाचं नाही तर आहाराची पद्धतही महत्वाची असते. बरेच लोक जेवण केल्यावर आंघोळ करतात. पण असं करणं योग्य असतं का?

Is bathing After Eating Bad for Your Health? know what Ayurveda and modern science says | जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतं आयुर्वेद

जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतं आयुर्वेद

googlenewsNext

Bathing After Meal : जेवण ही सगळ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही. जेवणाचा आरोग्याशीही संबंध असतो. चांगला आहार तुम्ही नेहमी निरोगी आणि फीट ठेवतो. पण यात काही गडबड झाली तर आरोग्य बिघडतं. फक्त चांगला आहार घेणं इतकंच महत्वाचं नाही तर आहाराची पद्धतही महत्वाची असते. बरेच लोक जेवण केल्यावर आंघोळ करतात. पण असं करणं योग्य असतं का?

आयुर्वेद काय सांगतं?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांचाच टाईमटेबल बिघडला आहे. त्यामुळे वेळी-अवेळी लोक आंघोळ करतात. आयुर्वेदात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. आयुर्वेद भारतातील फार जुनी चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो आणि यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये.

अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मॉडर्न सायन्स काय सांगतं?

मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं की, आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

एक्सपर्ट्स काय सांगतात?

एका एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. याने अ‍ॅसिडीटी, उलटी आणि इतकेच काय तर लठ्ठपणाही वाढू शकतो. निसर्गानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला ताजंतवाणं वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याने सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

Web Title: Is bathing After Eating Bad for Your Health? know what Ayurveda and modern science says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.