आयुर्वेदानुसार दुपारी झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या कुणी टाळावी 'ही' सवय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:59 AM2024-09-17T11:59:10+5:302024-09-17T11:59:51+5:30
Day Nap Good Or Bad: दुपारी झोप घेणं आयुर्वेदानुसार चांगलं असतं की नाही हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Day Nap Good Or Bad: बरेच लोक जे घरीच असतात किंवा सुट्टीच्या दिवशी घरी असतात ते सामान्यपणे दुपारचं जेवण झाल्यावर मस्त झोप घेतात. मात्र, दुपारी झोप घेणं आयुर्वेदानुसार चांगलं असतं की नाही हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. कारण हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
दिवसा झोपणं योग्य की अयोग्य?
आयुर्वेदानुसार, दिवसा झोपणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. पण थकवा, सुस्ती आणि जास्त मेहनत केल्यानंतर आपण स्वत:ला रोखू शकत नाही. मग आरामात बेड, खुर्ची किंवा सोफ्यावर झोपतो. रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, दिवसा झोपल्याने शरीरात कफ वाढतो. 10 ते 15 मिनिटांची झोप घेणं चुकीचं नाही, पण दिवसा अनेक तासांची गाढ झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
कुणी टाळावी दुपारची झोप?
- जर तुम्हाला फिट रहायचं असेस, सोबतच मेंटल हेल्थही चांगली ठेवायची असेल तर दिवसा झोपू नका.
- जे लोक पोटावरील आणि कंबरेची चरबी कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी केवळ रात्री झोपावं.
- जे लोक जास्त तेलकट, तळलेले किंवा मैद्याचे पदार्थ खातात त्यांनी दिवसा अजिबात झोपू नये.
- जे नेहमीच कफ वाढण्याच्या समस्येने वैतागलेले असतात, त्यांनीही दिवसा झोप घेऊ नये.
- डायबिटीस, हायपोथायरॉइड आणि पीसीओएस आजाराने पीडित लोकांनी दिवसा झोपू नये.
दिवसा कोण झोपू शकतात?
- जे लोक प्रवासामुळे जास्त थकलेले असतात त्यांनी दिवसा थोडावेळ झोप घ्यावी.
- जे लोक फार सडपातळ किंवा कमजोर आहेत, त्यांनीही दिवसा झोपलं तर काही हरकत नाही.
- जर कोणत्या आजार किंवा सर्जरीनंतर डॉक्टर दिवसा आराम करण्यास सांगतात तेव्हाही दिवसा घ्यावी.
- चाइल्ड डिलिव्हरी करणाऱ्या महिलांनाही आरामाची गरज असते, त्यांनीही दिवसा झोप घ्यावी.
- 10 वर्षापेक्षा कमी आणि 70 वयापेक्षा जास्त असलेले लोकही दिवसा आराम करू शकतात.