रात्री अचानक घाम येतो, हार्ट बीट वाढतात?; असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:40 AM2024-02-23T11:40:26+5:302024-02-23T11:41:16+5:30
कोणतंही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला रात्री अचानक घाम येतो आणि तुमच्या हार्ट बीट वाढतात? जर असं होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही दोन्ही लक्षणं हार्ट अटॅकची असू शकतात. ज्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. हार्ट बीट अचानक वाढण्याची समस्या असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका, असा सल्लाही डॉक्टर देतात.
दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ तरुण कुमार म्हणतात की, हार्ट बीट वाढणं आणि अचानक जास्त घाम येणं हे हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. काहींना रात्री झोपतानाही अचानक घाम येऊ लागतो. अशा लोकांना हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या असतील तर घाम येणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
असं कोणतंही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ईसीजी आणि बीपीची तपासणी करून डॉक्टर ही समस्या ओळखू शकतात. ईसीजीमध्ये काही गडबड दिसल्यास इको किंवा सीटी स्कॅन देखील केलं जाऊ शकतं.
दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागातील डॉ. अजित जैन सांगतात की रात्री अचानक घाम येणं आणि हार्ट बीट वाढणं हे हृदयाच्या खराब आरोग्याचं लक्षण असू शकतं. काही प्रकरणांमध्ये ते स्ट्रोकचं कारण असू शकतं. या लक्षणांसोबत जर बीपी देखील जास्त असेल तर हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढतो.
डॉ.तरुण कुमार सांगतात की, हृदयासंबंधित आजार टाळण्यासाठी आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. आहारात जास्त फॅट असलेले पदार्थ खाऊ नका. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहा. जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर त्याचं औषध वेळेवर घ्या. रोज व्यायाम करा आणि मानसिक ताण घेऊ नका.
दर 6 महिन्यांनी हार्ट चेकअप करा. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट करून घ्या. जर तुम्हाला आधीच काही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषध घ्या आणि आहाराची काळजी घ्या. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.