केस धुण्यासाठी गरम पाणी चांगलं की थंड पाणी? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:47 PM2024-08-02T16:47:20+5:302024-08-02T16:52:11+5:30

गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. पण केस गरम पाण्याने धुवावे का?

Is hot water better for washing hair or cold water? know what expert says | केस धुण्यासाठी गरम पाणी चांगलं की थंड पाणी? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

केस धुण्यासाठी गरम पाणी चांगलं की थंड पाणी? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

Hair Care : केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर कमी वयात केसगळती होऊन टक्कल पडू लागतं. त्यामुळे जेवढी चेहऱ्याची काळजी घेतली जाते तेवढीच केसांची देखील घ्यावी. तेल, धूळ, माती, केमिकल्स यामुळे केसगळतीची समस्या खूप जास्त वाढतो. अशात अनेकांना असाही प्रश्न पडतो की, केसगळती रोखण्यासाठी थंड पाणी वापरावं की  गरम पाणी? 

गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. पण केस गरम पाण्याने धुवावे का? किंवा असं करणं योग्य राहील का? कारण गरम पाण्याने केस धुतल्याने केस रखरखीत होतात, निर्जिव होतात आणि कमजोर होतात अशी धारणा आहे. मग काय अशावेळी केस थंड पाण्याने धुतले पाहिजे? असाही प्रश्न उभा राहतो. 

एका प्रसिद्ध हेअर एक्सपर्टनुसार, केस हे नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. याने शॅम्पू सहजपणे आणि चांगल्याप्रकारे निघून जातं. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, पाणी थंड असण्यासोबत पाण्याची क्वालिटी काय आहे याचीही काळजी घेतली पाहिजे. ज्या पाण्याने तुम्ही केस धुणार आहात ते सॉफ्ट वॉटर असायला हवं, हार्ड वॉटरने केस धुतल्याने शॅम्पूमध्ये चांगला फेस तयार होत नाही आणि केस रखरखीतही होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी सॉफ्ट पाण्याचाच वापर करावा.

गरम पाणी केसांसाठी चांगलं नाहीच. पण तरीही जर तुम्ही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुवू शकत नसाल तर कोमट पाण्याचा वापर करु शकता. असंही करु नका की, शरीरासाठी गरम पाणी आणि केसांसाठी थंड पाणी. कारण दोन प्रकारच्या तापमानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी वापरणे सर्वात चांगला पर्याय आहे. 

Web Title: Is hot water better for washing hair or cold water? know what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.