बोटं मोडण्याची सवय तुमच्यासाठी नुकसानकारक असते का? वाचा एक्सपर्टचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:27 PM2024-03-18T15:27:00+5:302024-03-18T15:27:22+5:30
एका रिसर्चनुसार, पुन्हा पुन्हा बोटं मोडल्याने बोटांचे जॉइंट्स कमजोर होतात आणि बोटं वाकडी होण्याची शक्यता वाढते.
Cracking knuckles side effects : तुम्ही अनेकदा काही लोकांना बसल्या बसल्या आपले बोटं मोडताना पाहिलं असेल. तुम्हीही कधीना कधी बोटं मोडली असतील. बोटं मोडल्यावर तुम्हाला चांगलं वाटत असेल, पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. बऱ्याच लोकांना याची सवय लागते. तुम्हालाही बोटं मोडण्याची सवय लागली असेल तर वेळीच व्हा सावध. एका रिसर्चनुसार, पुन्हा पुन्हा बोटं मोडल्याने बोटांचे जॉइंट्स कमजोर होतात आणि बोटं वाकडी होण्याची शक्यता वाढते.
पुन्हा पुन्हा बोटं मोडल्याने हातांची पकडही कमजोर होऊ शकते. याने नसा आणि मांसपेशींचं नुकसान होऊ शकतं. पुन्हा पुन्हा बोटं मोडल्याने जॉइंट्समध्ये सूजही येऊ शकते. ज्यामुळे वेदना होऊ शकतात. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, यामुळे आर्थरायटिस आजाराचा धोकाही वाढतो. जॉइंट्समध्ये असलेल्या तरल पदार्थात गॅस बुडबुडे तयार होता, जे बोटं मोडल्यावर निघून जातात. पण पुन्हा पुन्हा बोटं मोडल्याने हा तरल पदार्थ कमी होतो. ज्यामुळे जॉइंट्सचं नुकसानही होतं.
जॉइंट्स डिसलोकेट होण्याचा धोका
एक्सपर्ट्सनुसार, तुम्ही जर कधी कधी बोटं मोडत असाल तर तुम्हाला काही नुकसान होणार नाही. पण तुम्ही जर रोज असं करत असाल तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. असं केल्याने तुमच्या बोटांच्या जॉइंट्सचे टिश्यू वीक होतात आणि जॉइंट्स डिसलोकेट होण्याचा धोका राहतो. जास्त काळ असं केल्याने अर्थरायटिसचा धोका राहतो. ही सवय लहान मुलांसाठी ही सवय धोकादायक ठरू शकते. कारण त्यांच्या बोटांची हाडे नाजूक असतात.
पाठ आणि मान मोडण्यात मजा का येते?
बरेच लोक आपली मान आणि पाठ मोडतात. त्यांना यात मजाही येते. असं केल्यावर त्यातून एंडोर्फिन्स रिलीज होतं. जे एक नॅचलर पेनकिलर आहे. अनेकदा आपल्याला आवाज ऐकल्यावर असं वाटतं की काहीतरी झालं. पण मुळात काहीच झालेलं नसतं.