Skin Care Tips हिवाळ्यात सनस्क्रीन लावणे चांगले की वाईट ? बघा तज्ञांचा सल्ला काय सांगतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:50 PM2022-11-20T14:50:55+5:302022-11-20T14:52:08+5:30

उन्हाळ्यात Sunscreen सनस्क्रीन लावून बाहेर पडायची सवय असते. यामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण होते. पण प्रश्न पडतो की हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावण्याची गरज आहे का ?

is-it-good-to-apply-sunscreen-in-winter-also-see-what-experts-say | Skin Care Tips हिवाळ्यात सनस्क्रीन लावणे चांगले की वाईट ? बघा तज्ञांचा सल्ला काय सांगतो

Skin Care Tips हिवाळ्यात सनस्क्रीन लावणे चांगले की वाईट ? बघा तज्ञांचा सल्ला काय सांगतो

Next

Skin Care Tips उन्हाळ्यात Sunscreen सनस्क्रीन लावून बाहेर पडायची सवय असते. यामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण होते. पण प्रश्न पडतो की हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावण्याची गरज आहे का ? अनेक जण उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणे बंद करतात कारण बाहेर फार ऊन नसते तसेच तापमान कमी असते. मात्र हिवाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

उन्हाळ्यात सूर्याचे UV Rays युव्ही किरण त्वचेसाठी जितके नुकसानकारक आहेत तितकेच हिवाळ्यातही आहेत. हिवाळ्यात या किरणांची दाहकता जाणवत नसली तरी ते तुमच्या त्वचेला तेवढीच हानी पोहचवतात. थंडीत त्वचा रुक्ष, कोरडी होते. अशा त्वचेवर युव्ही किरणे आल्याने त्वचेला धोका पोहचतो. यामुळे हिवाळ्यातही सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीनमध्ये युव्ही किरणांपासून त्वचेची रक्षा करण्याची क्षमता असते. सोबतच त्वचा स्मूथ आणि हायड्रेटही ठेवते. सनस्क्रीन हानिकारक तत्वांपासून त्वचेची सुरक्षा करते. 

युव्ही किरणे त्वचेला डॅमेज करण्यासोबतच चेहरा आणखीनच कोरडा, रुक्ष करतात. थंडीत लोक पाणी कमी पितात त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहत नाही. याची स्रवात पहिले परिणाम त्वचेवर होतो. केवळ सूर्याची किरणे नाही तर प्रदुषण, लाईट्स यामुळेही त्वचा डॅमेज होते. यासाठी उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही सनस्क्रीन लावावे.

सनस्क्रीन कधी लावावे ?

बाहेर पडण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो.

दिवसभर बाहेरच असाल तर दिवसातुन दोन वेळा सनस्क्रीन लावावे.


 

Web Title: is-it-good-to-apply-sunscreen-in-winter-also-see-what-experts-say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.