रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने फायदा होतो की नुकसान?; जाणून घ्या, पिण्याची पद्धत आणि वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 04:54 PM2024-07-24T16:54:40+5:302024-07-24T16:55:56+5:30
रिकाम्या पोटी दूध पिऊ शकतो का? ते पिण्याची योग्य वेळ कोणती? रात्री किंवा दिवसा दूध पिणे ही व्यक्तीची वैयक्तिक निवड असते. त्याबाबत जाणून घेऊया...
दूधआरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखे मल्टी न्यूट्रीएंट्स मोठ्या प्रमाणात असतात. दूध प्यायल्याने हाडं आणि स्नायूही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मन दोन्ही अधिक एक्टिव्ह राहतं.
व्हिटॅमिन डी मेंदूसाठी खूप चांगलं आहे. पण अनेक वेळा प्रश्न पडतो की रिकाम्या पोटी दूध पिऊ शकतो का? ते पिण्याची योग्य वेळ कोणती? रात्री किंवा दिवसा दूध पिणे ही व्यक्तीची वैयक्तिक निवड असते. त्याबाबत जाणून घेऊया...
सकाळी दूध पिण्याचे फायदे
सकाळी दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. सकाळी दूध प्यायल्याने कमकुवत झालेल्या हाडांनाही फायदा होतो. स्नायूही मजबूत होतात. सकाळी दूध पिणे खूप फायदेशीर आहे.
सकाळी दूध पिण्याचे तोटे
काही लोकांना लैक्टोजची समस्या असते. यामुळे पोटदुखी, डायरिया आणि गॅसची समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होऊ शकते. ज्या लोकांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम न करता थंड दूध प्यावे जेणेकरून तुमच्या पोटात ॲसिडिटी होणार नाही.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी दूध पिणे हानिकारक आहे पण जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध प्यायलात तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. रिकाम्या पोटी दूध पिऊ नका, काही खाल्ल्यानंतरच प्या. लो फॅट किंवा स्किम्ड दूध आरोग्यासाठी चांगलं असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा हृदयविकार असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावं, ते खूप फायदेशीर आहे.
रात्री दूध प्यायल्याने झोप चांगली लागते आणि गरम दुधात हळद मिसळून प्यायल्यानेही आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. रिसर्चनुसार, तुम्ही सकाळी दूध पिऊ शकता परंतु ते पिण्यापूर्वी काही फळं किंवा नाश्ता खा. दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका.