सकाळी ब्रश न करताच पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:04 AM2024-05-10T11:04:29+5:302024-05-10T11:04:57+5:30
Benefits Of Drinking Water: पाणी पिण्याच्या या सवयीबाबत लोकांना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे सकाळी ब्रश न पाणी पिणं योग्य की अयोग्य? चला जाणून घेऊ....
Benefits Of Drinking Water: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण सोबतच पाणी कधी आणि किती प्यावं हेही महत्वाचं आहे. पाणी पिण्याच्या लोकांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. बरेच लोक सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश न करताच पाणी पितात. तर काही लोक ब्रश केल्यावर पाणी पितात. पाणी पिण्याच्या या सवयीबाबत लोकांना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे सकाळी ब्रश न पाणी पिणं योग्य की अयोग्य? चला जाणून घेऊ....
शरीर हयड्रेट राहतं
सकाळी उठताच ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहतं. असं केल्याने पोटासंबंधी अनेक समस्याही कमी होतात. ज्याचा थेट त्वचेवर प्रभाव पडतो. त्वचा चमकदार होते.
डायजेशन मजबूत होतं
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार ब्रश करण्याआधीच पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीम मजबूत होते. ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचावही होतो.
स्ट्रॉग इम्यून सिस्टम
ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. ज्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
केस आणि त्वचा चांगली राहते
सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांवर चांगला प्रभाव पडतो. तसेच एकूण आरोग्यासाठीही हे चांगलं मानलं जातं.
बीपी कंट्रोल राहतं
हाय बीपी आणि शुगरच्या रूग्णांसाठी ही सवय चांगली मानली जाते. सकाळी ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने बीपी आणि शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
तोंडाची दुर्गंधी दूर होते
पाणी पिण्याच्या या सवयीने तोडांची दुर्गंधीही दूर होते. यासाठी सकाळी कोमट पाणी पिणं फायदेशीर असतं. रात्री झोपताना तोंडात लाळ कमी झाल्याने अनेक बॅक्टेरिया उत्पन्न होतात, अशात कोमट पाणी प्याल तर ही समस्या दूर होते.