रोज बटाटे खाणं किती योग्य आणि काय याने वजन वाढतं? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:43 AM2023-08-09T09:43:50+5:302023-08-09T09:44:11+5:30

Eating Potato Daily Health Benefits:  बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रैट राहतं, ज्याबाबत लोकांचं मत आहे की, याने ब्लड शुगर आणि वजन वाढतं. पण सत्य वेगळंच आहे. चला जाणून घेऊ...

Is your potatoes healthy daily eating is bad or good | रोज बटाटे खाणं किती योग्य आणि काय याने वजन वाढतं? जाणून घ्या सत्य

रोज बटाटे खाणं किती योग्य आणि काय याने वजन वाढतं? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

Eating Potato Daily Health Benefits:  भारतात बटाटे वेगवेगळ्या पद्धतीने रोज खाल्ले जातात. बटाट्याची भाजी तर प्रमुख भाज्यांपैकी एक आहे. तसेच वेगवेगळ्या डिशमध्ये बटाटे मिक्स केले जातात. पण ते बटाटे खाता ते हेल्दी आहेत  का? बटाट्याच्या हेल्दी डाएटबाबत नेहमीच कन्फ्यूजन राहतं. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रैट राहतं, ज्याबाबत लोकांचं मत आहे की, याने ब्लड शुगर आणि वजन वाढतं. पण सत्य वेगळंच आहे. चला जाणून घेऊ...

एक्सपर्टने सांगितलं की, बटाटे खूप हेल्दी असतात आणि त्यात भरपूर पोषक तत्वेही असतात. यात फायबर, पोटॅशिअम, आयरन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन 6 सुद्धा असतात. तरीही काही लोक बटाट्याला अनहेल्दी मानतात. एक्सपर्टनुसार, याचं कारण आहे बटाटे बनवण्याची पद्धत.
जेव्हा तुम्ही बटाटे डिप फ्राय करता तेव्हा ते  अनहेल्दी बनतात. त्यामुळेच फ्रेंच फ्राय अनहेल्दी असतात आणि याने अनेक आजार होतात. जर बटाटे तुम्हाला हेल्दी पद्धतीने खायचे असतील तर ते उकडा नाही तर शिजवा किंवा मग बेक करा. हलके फ्राय केले तरी यातील पौष्टिकता नष्ट होत नाही.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, बटाटे रोज खाल्ल्याने नुकसान होतं का? एक्सपर्टनुसार, जर बटाटे हेल्दी पद्धतीने शिजवले किंवा उकडले जातील तर याने काहीच नुकसान होत नाही. रोज बटाटे खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. यातील फायबर आणि पोटॅशिअम हेल्थसाठी फायदेशीर आहे. 

बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं का? याचं तेच उत्तर आहे की, जर योग्य पद्धतीने बटाटे शिजवले किंवा उकडले आणि त्यांची पौष्टिकता नष्ट झाली नाही तर याने वजन वाढत नाही. पण जास्त खाल तर वजन वाढू शकतं.

बटाटे खाल्ल्याने आपल्या शरीरात एनर्जी वाढते. बटाट्या भरपूर कार्बोहायड्रैट असतात ज्यामुळे लगेच एनर्जी तयार होते. जी मेंदू शरीरासाठी फायदेशीर असते. जे लोक एक्सरसाइज करतात त्यांना कार्बोहायड्रैटची जास्त गरज असते. 
 

Web Title: Is your potatoes healthy daily eating is bad or good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.