सकाळी लवकर जाग येत नाही. मग या 10 गोष्टी करा. पहाटे लवकर जाग येईल!
By Admin | Published: June 22, 2017 04:57 PM2017-06-22T16:57:26+5:302017-06-22T16:58:39+5:30
उठण्याच्या संबंधातले काही नियम पाळले तर पहाटे लवकर उठणं हे कोणाहीसाठी अशक्यप्राय कधीच होणार नाही.
- माधुरी पेठकर.
रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे हा विचार आपल्या आजीपासून आईपर्यंत सर्वच सांगतात. हा विचार पटतोही. पण वळत मात्र नाही. कारण काहीही करा सकाळी लवकर जाग येत नाही ती नाहीच. केवळ सकाळी लवकर उठता येत नाही म्हणून मनात ठरवलेले कित्येक चांगले संकल्प तडीस जात नाही. वाचायचं असतं, व्यायाम करायच असतो, दिवसभरात जास्तीत जास्त कामं उरकायची असतात. पण हे लवकर उठणंच होत नाही. त्यामुळे सर्व कामं रखडतात. संपूर्ण दिवस जर ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करायचं असेल तर सकाळची उठण्याची वेळ ( लवकरची) ती पाळायलाच हवी. ती पाळ्णं होत नसेल तर काही गोष्टी करून पाहायला हव्यात. झोपेला शिस्त लावून, उठण्याच्या संबंधातले काही नियम पाळले तर पहाटे लवकर उठणं हे कोणाहीसाठी अशक्यप्राय कधीच होणार नाही.