रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 10:39 AM2019-09-07T10:39:18+5:302019-09-07T10:39:54+5:30

रात्री झोपण्यापूर्वी जेवणासंबंधी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. खासकरून असं सांगितलं जातं की, रात्री हलकं जेवण करावं.

Is it ok to have a protein shake before bed? | रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!

रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!

Next

रात्री झोपण्यापूर्वी जेवणासंबंधी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. खासकरून असं सांगितलं जातं की, रात्री हलकं जेवण करावं. तसेच तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्रीचं जेवण लवकर आणि कमी करण्याचा सल्ला एक्सपर्टही देतात. हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की, हाय प्रोटीन डाएट सकाळच्या नाश्त्यात घेतली जावी. तसेच रात्री हाय प्रोटीन असलेला आहार घेतल्याने वजन अधिक वाढतं असंही सांगितलं जातं.

पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, रात्री हाय प्रोटीन डाएट घेतल्याने लठ्ठपणाचा धोका अजिबात राहत नाही. खासकरून अशा महिलांना ज्या लाइफमध्ये अ‍ॅक्टिव असतात. रात्री हाय प्रोटीन डाएट घेतल्याने शरीराच्या मेटाबॉलिज्मवर काहीही नकारात्मक प्रभाव पडत नाही.

काय सांगतो रिसर्च?

न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, रात्री झोपण्यापूर्वी हाय प्रोटीन डाएट किंवा प्रोटीन शेक घेतलं जातं. याचा शरीरावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही. हा रिसर्च महिलांवर करण्यात आला होता. यात यावर जास्त जोर देण्यात आला की, रात्री जेवण करणे किंवा रात्री हाय प्रोटीन डाएट घेतल्याने बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबीवर काय प्रभाव पडतो.

आतापर्यंत असं मानलं जातं की, रात्री हेवी डाएट घेतल्याने बेली फॅट किंवा बॉडी फॅट वाढण्याची शक्यता अधिक जास्त राहते. काही डाएट एक्सपर्ट्स असंही मानतात की, रात्री जेवण केल्यानेही लठ्ठपणा वाढतो. या रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त महिला अ‍ॅक्टिव लाइफ जगणाऱ्या होत्या. इथे अ‍ॅक्टिव लाइफचा संबंध नियमितपणे व्यायाम करण्याशी जोडण्यात आला आहे.

रात्री हाय प्रोटीन घेण्याच्या अटी

जसे की, आपणा सर्वांना हे माहीत आहेच की, रात्री हेवी डाएट घेणं हे लठ्ठपणाचं मुख्य कारण आहे. याचं मुख्य कारण हे असतं की, रात्री हेवी डाएट घेतल्याने पचन तंत्र आणि मेटाबॉलिज्मवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं.

रात्री हलक्या जेवणासोबतच हाय प्रोटीन डाएट जसे की, प्रोटीन शेक घेतलं जाऊ शकतं. तसेच तुम्ही जर नियमितपणे एक्सरसाइज करत असाल, तर रात्री हाय प्रोटीन घेणं चुकीचं किंवा नुकसानकारक ठरत नाही, यात सांगण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही रोज ३० मिनिटे एक्सरसाइज करत असाल तर दिवसभरात तुम्ही कधीही हाय प्रोटीन डाएट घेऊ शकता.

(टिप : हाय प्रोटीन डाएट संदर्भातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ते फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: Is it ok to have a protein shake before bed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.