उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य? पहा काय म्हणतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:40 PM2021-06-02T20:40:58+5:302021-06-02T20:41:52+5:30

काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे.

Is it right or wrong to drink kadha in summer? See what the experts says | उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य? पहा काय म्हणतात तज्ज्ञ

उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य? पहा काय म्हणतात तज्ज्ञ

googlenewsNext

पुर्वी फक्त कोरोनाच्या काळात सर्दी, ताप आणि खोकला जाण्यासाठी काढा प्यायला जायचा. पण आता इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा प्यायला जातो. सध्या प्रत्येक घरात काढा तयार होतो. मात्र, काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. काढा तयार करण्यासाठी लवंग, तुळस, दालचिनी, आले, काळी मिरी, हिंग, पुदिन्याचा पाने, सुंठ अशी बरीच मसाले वापरली जातात. यामुळे हंगामी संक्रमण आणि फ्लूशी लढायला मदत होते. याशिवाय संधिवात, डोकेदुखी, दमा, जंतुसंसर्गसारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.  न्युट्रिशनिस्ट डॉ. नेहा पठानिया यांनी याचे उत्तर दिले आहे. हेल्थशॉट्स या वेबसाईटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

कोरोना काळात काढा कसा फायदेशीर?
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा सर्वात उपयोगी आहे. काढ्यात औषधी वनस्पती आणि मसाले असतात. ज्यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. मात्र, जर काढ्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते अत्यंत हानीकारक आहे.

उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य?
उन्हाळ्यात प्रमाणातच काढा पिणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे शरीराला कोणताही अपाय होणार नाही. काढा शरीर निरोगी राहण्यासाठी उत्तम पेय आहे. त्यामुळे लक्षात घ्या, काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अ‍ॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाचे विकार उद्भवतात.

काढ्याचे सेवन अशाप्रकारे करा

  • दुपारी ४-५च्या सुमारास काढा पिणे फायदेशीर आहे.
  • काढा शक्यतो रिकाम्या पोटी पिऊ नये, यामुळे पित्त होऊ शकते. तसेच जेवल्यानंतरही लगेचच काढा पिणे टाळा.
  • एका वेळी 150 मिली पेक्षा जास्त काढा पिऊ नका.
  • शक्यतो काढ्यामध्ये मध टाका. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवणार नाही.
  • काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत.
  • काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
  • लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.

Web Title: Is it right or wrong to drink kadha in summer? See what the experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.