जॉगिंग करताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य? पाहा तज्ज्ञ काय सांगतायत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:52 PM2021-06-09T20:52:19+5:302021-06-09T20:54:12+5:30
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
तुम्ही जर व्यायाम करायला बाहेर पडत असाल किंवा मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर तुम्हाला स्वत:ची काळजी घेणे भाग आहे. यासाठी प्रत्येकजण मास्कचा वापर करत असेल पण ते योग्य की अयोग्य हे फारच कमी जणांना माहित असेल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
डॉ. रितू बुदानिया यांनी फार्म ईझी या संकेतस्थळाला दिलेल्य़ाकोरोनाकाळात संसर्गापासून बचवण्यासाठी आपण सगळे मास्क घालतो. मात्र जॉगिंग, मॉर्निंग वॉक किंवा व्यायाम करताना मास्क घातल्याने तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही जेव्हा यापैकी कोणतीही क्रिया करता त्यावेळी तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्ही हवेतून जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तुम्ही कार्बन डायॉक्साईडही जास्त सोडता. अशावेळी तो ऑक्सिजन मास्कमध्येच अडकून राहतो. हा कार्बन डायॉक्साईड पुन्हा नाकावाटे आत जातो. त्यामुळे तुम्हाला श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो. तसेच त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. परंतू जेव्हा तुम्ही जॉगिंग करताना आजूबाजूला गर्दी असेल तसेच जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठीण असेल तेव्हा मास्क घालणेच योग्य.