कोरोना विषाणूंच्या प्रसाराबाबत 'या' देशांतील संशोधकांचा धक्कादायक खुलासा; तज्ज्ञांनी सांगितलं की...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:57 PM2020-07-22T14:57:38+5:302020-07-22T15:14:00+5:30
संशोधनासाठी फेब्रुवारी आणि एप्रिलच्या मधल्या काळात सापडलेल्या ३०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णाच्या रक्ताचे नमुने एकत्र केले होते. त्यांच्या जीन्समध्ये झालेला बदल आणि व्हायरसच्या वाढत्या संख्येचा अभ्यास करण्यात आला होता.
कोरोना व्हायरस कुठून आला याबाबत सध्या कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. चीनच्या मासळी आणि प्राण्यांच्या बाजारातून कोरोना व्हायरस पसल्याचा दावा अनेक तज्ज्ञांकडून करण्यात आला होता. कोरोना व्हायरस चीनमधून पसरला यावर संपूर्ण जगाचा विश्वास बसत असला तरी इटलीतील संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनात उघड झालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरूवात चीनमध्ये झालेली नाही.
हे संशोधन डी मिलान विद्यापीठातील प्रोफेसर कार्लो फेडेरिको पेर्नो यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं. संशोधकांनी संशोधनासाठी फेब्रुवारी आणि एप्रिलच्या मधल्या काळात सापडलेल्या ३०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णाच्या रक्ताचे नमुने एकत्र केले होते. त्यांच्या जीन्समध्ये झालेला बदल आणि व्हायरसच्या वाढत्या संख्येचा अभ्यास करण्यात आला होता.
चीनच्या सगळ्या प्रकारच्या उड्डणांवर बंदी घालणारा इटली हा पहिला देश होता. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जीनोम सिक्वेंस आणि इतर नमुन्यांवरून दिसून आले की व्हायरसचा प्रसार थेट चीनमधून झालेला नाही. इटलीतील लोम्बार्डी सगळ्यात जास्त समृद्ध आणि कोरोना व्हायरसने प्रभावित असलेल्या क्षेत्रांपैकी आहे. चीनमधील संशोधकांनी सुरूवातीला Sars-CoV-2 ला वेगळ्या श्रेणीत टाकले होते. त्यांच्यामते २० फेब्रुवारीला लोम्बार्डीतील आरोग्य अधिकारी यांना स्थानिक पातळीवर संक्रमण झाल्याचे दिसून आले. पण त्याआधीच कम्युनिटी ट्रांसमिशनला सुरूवात झाली होती.
प्रोफेसर पेर्नो यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ प्रदेशातून ३७१ रुग्णांचे रक्ताचे नमुने एकत्र करण्यात आले होते. रुग्णालयात भरती केलेल्या सौम्य आणि गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या अभ्यासानुसार व्हायरसचे दोन वेगवेगळे प्रकार दिसून आले. रोममध्ये एका चायनीज दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर इटलीत ३१ जानेवारीला चीनच्या प्रवाश्यांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. मागील काही दिवसात नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं की, डिसेंबरच्या मध्यात मिलान आणि ट्युरिन शहरातील सांडपाण्यात व्हायरस दिसून आला होता.
पेर्नोच्या नवीन अभ्यासातून असे दिसून आले की इटलीतील लोम्बार्डीतील व्हायरस अनेक ठिकाणी होता. त्यातून व्हायरसचे वेगवेगळ्या व्हायरसची चेन तयार झाली. इटलीच्या संशोधनातून दिसून आले की या व्हायरसचा प्रसार चीनमधून झालेला नाही. आधीही न्युयॉर्क, पॅरिस आणि स्पेनच्या संशोधनात नमूद करण्यात आले होते की कोरोना विषाणू आणि चीनचा कोणताही थेट संबंध नाही.
आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं