त्वचेवर सतत येणारी खाज असू शकते लिव्हरच्या 'या' आजाराचं लक्षणं; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:11 PM2020-08-20T16:11:16+5:302020-08-20T16:15:05+5:30

अनेकांचा असा समज आहे की, लिव्हरसंबंधी समस्या जे लोक मद्यपान  करतात त्यांनाच उद्भवतात. असं नसून इतर अनेक कारणांमुळे लिव्हरसंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Itching on the skin can be a symptom of liver disease, Knoe symptoms | त्वचेवर सतत येणारी खाज असू शकते लिव्हरच्या 'या' आजाराचं लक्षणं; वेळीच सावध व्हा

त्वचेवर सतत येणारी खाज असू शकते लिव्हरच्या 'या' आजाराचं लक्षणं; वेळीच सावध व्हा

googlenewsNext

शरीरातील अवयवांपैकी लिव्हर सुद्धा एक महत्वाचा अवयव आहे. आपण जसा आहार घेतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.  अनेकांचा असा समज आहे की, लिव्हरसंबंधी समस्या जे लोक मद्यपान  करतात त्यांनाच उद्भवतात. असं नसून इतर अनेक कारणांमुळे लिव्हरसंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लिव्हरच्या आजारात हिपॅटिक स्टेटॉसिस असंही म्हणतात. लिव्हरमध्ये फॅट्सचं प्रमाण वाढल्यानंतर सूज येते. सुज वाढत गेल्यास गंभीर स्थिती निर्माण होते. अनेकदा लिव्हर फेलियोर हा आजार होतो.

जास्तीत जास्त लोकांकडून या आजारांच्या लक्षणांकडे कानाडोळा केला जातो. फॅटी लिव्हरमुळे रुग्णांना थकवा येणं, पोटावर डाव्या बाजूला दुखणं, हात लाल होणं, वजन कमी होणं, त्वचेच्या खालच्या स्तरावर वाढलेल्या रक्तवाहिन्यांही दिसून येतात. त्यामुळे त्वचेवर सतत खाज येते.  हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यासाठी असामान्य लक्षणं दिसून आल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. रेग्युलर रुटीन चेकअप करत राहा. गांभिर्यानं न घेतल्यास वाढत्या वयात लिव्हर फायर्बोसिस हा आजार उद्भवू शकतो. हा आजार शेवटच्या स्टेजला पोहोचण्याआधी उपचार केल्यास रुग्णांचा बचाव होऊ शकतो. 

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

लिव्हर अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतं. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास या समस्येस फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. डायबिटीस असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. 

वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. अन्नाचं पचन करण्यासाठी लिव्हरचं कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. योग्य प्रमाणात आहार शरीराला मिळाला नाही तर पचनक्रियेवर परिणाम होतो. परिणामी फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते.

तळलेल्या पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन होत असल्यास लिव्हरच्या समस्या वाढण्याची भीती जास्त असते. तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात. मिठाचा वापर कमीत कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठामुळे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तसंच मादक पदार्थांचे सेवन फॅटी लिव्हर असणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. 

लिव्हरच्या समस्यांपासून लाबं राहण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश 

अक्रोडात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे  यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार,फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

एपल व्हिनेगरमुळे  पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी एपल व्हिनेगर फायदेशीर असतं. त्यात अनेक एंटी-ऑक्सिडटंस असतात. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो.

कॉफीमध्ये असलेल्या  तत्त्वांमुळे मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरचा त्रासदेखील कॉफी बऱ्याच प्रमाणात कमी करते. तरीही कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आवश्यक आहे.

लिव्हर सिरोसिसची समस्या उद्भवल्यास तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. आवळा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. व्हिटामीन सी आवळ्यात मोठ्या प्रमाणात असतं. रोज ३ ते ४आवळे खाऊन दीर्घकाळ आरोग्य चांगलं ठेवू शकता.

लिव्हर सिरोसिसची समस्या उद्भवल्यास तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. आवळा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. व्हिटामीन सी आवळ्यात मोठ्या प्रमाणात असतं. रोज ३ ते ४ आवळे खाऊन दीर्घकाळ आरोग्य चांगलं ठेवू शकता.

इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी व्हिनेगर फायदेशीर ठरते. नियमित व्हिनेगरचं सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळापर्यंत तंदरुस्त राहू शकता.  एक ग्लास पाण्यात एक चमचा एप्पल साडयर व्हिनेगर आणि मध घालून प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते.

हे पण वाचा-

खुशखबर! ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्गाचा धोका नाही, संशोधनातून खुलासा

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

भारतामध्ये चौथ्या कोरोना प्रतिबंधक लसीचेही उत्पादन

Web Title: Itching on the skin can be a symptom of liver disease, Knoe symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.