वारंवार डोके खाजवताय; हे कारण तर नाही ना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:51 AM2024-02-17T11:51:11+5:302024-02-17T11:54:13+5:30
डोक्याला खाज सुटली की, कशातच मन लागत नाही. लक्ष विचलित होते, ज्यामुळे आपले काम अर्धवट राहते.
Health Tips : केसांमध्ये कोंडा, उवा, स्कॅल्प, घाम, त्वचा कोरडी, केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर, अशा अनेक कारणांमुळे डोक्यावर खाज सुटते. काहीवेळेला खाजवून स्काल्पवरील त्वचा रखरखीत होते. समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करेल,असा प्रश्न पडतो. डोक्याला खाज सुटली की, कशातच मन लागत नाही. लक्ष विचलित होते, ज्यामुळे आपले काम अर्धवट राहते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
घाम येणे: प्रदूषणामुळे नेहमी डोक्यावर धूळ साचते. सध्या हिवाळा सुरू आहे. ज्यामुळे रात्री झोपताना टाळूवर प्रचंड खाज सुटते.
शरीराच्या तापमानात बदल: सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, शरीराचे तापमान नेहमी बदलत राहते. अनेक वेळा काही लोकांच्या शरीराचे तापमान रात्रीच्या वेळी वाढते, त्यामुळे त्वचेवर खाज सुटते.
रात्रीच्या वेळी त्वचेवर खाज सुटते :
१) या समस्येला नॉक्टर्नल प्रुरिटस म्हणतात. ज्याला ही समस्या आहे, त्याला रात्रीच्या वेळी त्वचेवर खाज सुटते.
२) ही खाज शरीराच्या कोणत्याही भागावर उठू शकते. टाळू नेहमीच उबदार असल्यामुळे तिथे जास्त खाज सुटते.
३) आपल्या शरीराला पोषक आहार न मिळाल्याने सुद्धा डोक्यात खाज येते.
हार्मोनल असंतुलन: रात्रीच्यावेळी, एंटी इंफ्लामेटरी हार्मोनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे त्वचेवर सूज येते आणि खाज सुटू लागते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आंबट पदार्थ खाऊ नयेत.
हे करा उपाय :
१) खोबरेल तेलात ऑलिव्ह ऑईल मिसळून गरम करा. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावून मसाज करा.
२) टाळूला गुलाबपाणीही लावू शकता. गुलाब पाण्यात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते.
३) गुलाबजल लावून टाळूवर हलका मसाज करा. जर आपल्याला स्ट्रेस असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा.
४) पलंग स्वच्छ ठेवा, दर ३ ते ४ दिवसांनी उशाचे कव्हर बदला.
५) आठवड्यातून दोनदा केस धुवावेत, कारण टाळूवर घाण साचल्यावर केसांना खाज सुटते.
६) केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल तर, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अँटी डँड्रफ शॅम्पू आणि घरगुती उपाय वापरून पाहावे.
तेलाचा वापर : तुम्ही सुगंधित, कोणतेही ब्रँडेड तेल न वापरल्यामुळे ही डोक्यात खाज येते, अशा तेलाचे रिएक्शन झाल्याने ही डोक्यात खाज येते. अशी अनेक कारणे आपल्या डोक्यात खाज येण्याची आहेत.