Health tips: गोड खाल्ल्याने वजन वाढते? डायबिटीस होतो? पण, 'हे' गोड फळ तर या दोन्ही त्रासांवर रामबाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:34 PM2022-04-06T17:34:30+5:302022-04-06T17:38:59+5:30
उन्हाळ्यात फणस आवर्जून खाल्ला जातो. फणस आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. फणसाला शाकाहारी लोकांचं नॉनव्हेजही म्हटलं जातं.
पोषणासाठी शाकाहारी लोकांना फारसे पर्याय नाहीत असं म्हटलं जातं. पण काही पदार्थ मात्र असे आहेत जे खाल्ल्यामुळे शाकाहारी लोकांनाही भरपूर पोषण मिळतं. भरपूर पोषणमूल्य असलेल्या भाजी-फळांमध्ये फणसाचाही (Jackfruit) समावेश होतो. देशभरात फणसाच्या विविध प्रकारच्या पाककृती केल्या जातात. विशेषत: उन्हाळ्यात फणस आवर्जून खाल्ला जातो. फणस आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. फणसाला शाकाहारी लोकांचं नॉनव्हेजही म्हटलं जातं.याचबद्दल आज तक वर अधिक माहिती देण्यात आली आहे.
प्रतिकार शक्ती वाढवणं
ऋतु बदलला की आजारांचं प्रमाण वाढतं. अशा हंगामी इन्फेक्शन आणि आजारांपासून दूर राहण्यास फणसाचं सेवन अत्यंत गुणकारी आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. फणसात व्हिटॅमिन ए, सी, बी यांच्यासह डाएट फायबर, पोटॅशियम,आयर्न, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळे आजाराशी लढणाऱ्या प्रतिकारशक्ती (Immunity building) वाढवण्यात फणस अत्यंत उपयुक्त ठरतो.
वजन कमी करणं
फणसात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं पण फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत होते. त्याशिवाय फणसामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. याचा उपयोग वजन नियंत्रणात ठेवण्यात (Weight Loss Management) होतो.
हाडं मजबूत करणं
फणस कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे असं आरोग्यतज्ज्ञ मानतात. कॅल्शियम आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियम असतं. हे घटक हाडं मजबूत (Strong Bones) करण्यात उपयुक्त असलेल्या कॅल्शियमला शोषून घेण्यात मदत करतात.
झोपेसाठी गुणकारी
झोपेबद्दलच्या इन्सोमेनियासारख्या तक्रारींवरही फणस अत्यंत गुणकारी आहे हे अनेकांना माहिती नाही. फणस जर डाएटमध्ये नियमितपणे खाल्ला जात असेल तर शरीरातील न्युरोट्रान्समीटर लेव्हल नियंत्रणात ठेवली जाते. त्यामुळे आपल्या नसांना आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते. त्यामुळे झोपेची (To regulate Sleep cycle) तक्रार असणाऱ्यांनी फणसाचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश अवश्य करावा.
डायबेटिस नियंत्रण
डायबेटिस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात (Diabetes Control) ठेवण्यामध्ये फणस अत्यंत उपयुक्त ठरतो. फणस खाल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणसात फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिन रिलीज करण्याचा वेग कमी होतो आणि भुकेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. परिणामी डायबेटिसच्या रुग्णांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
फणस उपयुक्त आहे हे आपण ऐकलेलं असतं पण इतका उपयुक्त आहे हे माहीत नसतं. त्यामुळे त्याचे आणखीही गुणधर्म जाणून घेऊन त्याचं सेवन वाढवलंत तर तुम्हालाही नक्कीच फायदा होईल.