डायबिटीसच्या रूग्णांसाठी कसा फायदेशीर ठरतो फणस?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:20 AM2019-07-11T11:20:58+5:302019-07-11T11:25:51+5:30
असेही अनेक पदार्थ किंवा फळं आहेत जे खाऊन लोक त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकतात. असंच एक फळ म्हणजे फणस.
डायबिटीसच्या रूग्णांना त्यांच्या आहाराबाबत फार काळजी घ्यावी लागते. कारण चुकीचं काहीही खाल्लं गेलं तर त्यांची शुगर वाढू शकते, जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण असेही अनेक पदार्थ किंवा फळं आहेत जे खाऊन लोक त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकतात. असंच एक फळ म्हणजे फणस. फणस खाऊन डायबिटीसचे रूग्ण त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेऊ शकतात.
लो ग्लायसेमिक इंडेक्स
फणसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं, म्हणजे यात ब्लड ग्लूकोजचं प्रमाण प्रभावित करणारे कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अनेकजण फणसाला डायबिटीसच्या रूग्णांसाठी सेफ मानतात. कारण याने शुगर लेव्हल अचानक वाढण्याचा धोका नसतो.
जास्त फायबर
फणसामध्ये फायबरचं प्रमाण फार जास्त असतं. फायबरमुळे पटचही हळू होतं, त्यामुळे रक्तातील शुगरचं प्रमाण अचानक वाढत नाही. या कारणाने फणसाच्या या क्वॉलिटी डायबिटीस रूग्णांसाठी शुगरचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास फार फायदेशीर ठरतात. तेच फास्ट फूड शरीर लवकर पचवतं. ज्यामुळे शुगरचं प्रमाण वेगाने वाढू लागतं. अशात फास्ट फूडपासून दूर राहणं डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं.
प्रोटीनचं प्रमाण अधिक
फणसामध्ये फायबरसारखंच प्रोटीनचं प्रमाण देखील अधिक असतं. एका रिपोर्टनुसार, प्रोटीन खाल्ल्याने रक्तातील शुगरचं प्रमाण अचानक वाढणं थांबवलं जातं. त्यामुळेही फणस खाण्याचा डायबिटीसच्या रूग्णांना मोठा फायदा होतो.
फणसाच्या पानांचा रस
(Image Credit : Sweat)
केवळ फणसच नाही तर याची पाने देखील डायबिटीसच्या रूग्णासाठी फायदेशीर मानली जातात. फणसाच्या पानांचा रस प्यायल्यास लगेच आणि जास्त काळासाठी ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत मिळते.
कच्च फणस जास्त फायदेशीर
असे मानले जाते की, पिकलेल्या फणसापेक्षा कच्च फणस जास्त फायदेशीर ठरतं. हे तुम्ही भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा वेगळ्या प्रकारेही खाऊ शकता.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. हे फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण काहींना याची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. ते टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.)