हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे? वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:21 PM2024-10-07T12:21:40+5:302024-10-07T12:22:24+5:30

How to eat Jaggery In Winter : हिवाळ्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबतच एका खास पदार्थाचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट आवर्जून देतात. तो पदार्थ म्हणजे गूळ.

Jaggery health benefits in winter, know the right way to consume it | हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे? वाचाल तर रहाल फायद्यात!

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे? वाचाल तर रहाल फायद्यात!

How to eat Jaggery In Winter : हिवाळा आला की वातावरणात तर बदल होतोच, सोबतच आपल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्येही बदल होतो. हिवाळ्यात जास्तीत जास्त लोकांची भूक वाढते. तसेच हे दिवस आरोग्यासाठी फारच पोषक मानले जातात. त्यामुळे आहारातही अनेक पौष्टिक गोष्टींचा समावेश केला जातो. हिवाळ्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबतच एका खास पदार्थाचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट आवर्जून देतात. तो पदार्थ म्हणजे गूळ.

गुळाला साखरेसारखं रिफाइन केलं जात नाही. ज्यामुळे त्यात अनेक पोषक तत्व कायम राहतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्याने थंडीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते. 

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

हेल्थ एक्सपर्टनुसार, गूळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं करावं हेही सांगणार आहोत.

१) मसल्स मजबूत होतात

हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न असतं. आयर्न हेल्दी ब्लड सेल्सला सपोर्ट करण्यात मदत करतं. याने तुमचा थकवा दूर होईल आणि मांसपेशी मजबूत होतील.

२) एनीमियापासून बचाव

शरीरात आयर्नची कमतरता झाली की, एमीनियाचा धोका वाढतो. ज्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे गूळ आयर्नचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. याचा नियमित आहारात समावेश केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो.

३) आजारांचा धोका कमी होतो

हिवाळ्यातील तुमच्या रोजच्या आहारात गुळाचा समावेश करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फेनोलिक अॅसिड असतं, ज्यामुळे शरीरावर ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी पडतो.

४) पचन तंत्र चांगलं राहतं

पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. बरेच बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे गुळाचं सेवन करतात.

५) इम्यूनिटी वाढते

गुळाचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. गुळात असलेल्या पोषक तत्व आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. अशात अनेक जुन्या आजारांना रोखलं जाऊ शकतं. 

कसं कराल गुळाचं सेवन?

गूळ तुम्ही थेटही खाऊ शकता. जर तुम्हाला थेट गूळ खाणं आवडत नसेल तर याचे गूळ आणि तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही बनवू शकता. तुम्ही रोज २५ ग्रॅम गुळाचं सेवन करू शकता. जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गुळाच्या चहाचं सेवन करतात. महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त गूळ खाल्ल्याने तुम्हाला जुलाब लागू शकतात. 

Web Title: Jaggery health benefits in winter, know the right way to consume it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.