साखर कि गुळ? वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही उत्तम काय? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 04:48 PM2021-09-03T16:48:38+5:302021-09-03T16:57:28+5:30

गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते.

jaggery vs sugar which is best for your health gud or sugar for weight loss | साखर कि गुळ? वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही उत्तम काय? जाणून घ्या सत्य

साखर कि गुळ? वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही उत्तम काय? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बहुतेक लोक तुम्हाला तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे वजन वाढते. बरेच लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात. अशा स्थितीत साखरेच्या जागी गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

गुळाचा वापर विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. पण आता लोक साखरेऐवजी गूळ पावडर वापरत आहेत. गुळामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे बी -१, बी -६ आणि सी असतात. यात फिनोलिक कंपाऊंड आहे. जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काढून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. या कारणांमुळे, नियमित गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गूळ साखरेपेक्षा जास्त पौष्टिक ?
साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. गुळात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स तसेच भरपूर फायबर असते, जे पचनशक्ती सुधारण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञ सकाळी गूळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय, गुळाची चव साखरेपेक्षा चांगली असते, जे चवीला साखरेपेक्षा कमी गोड असते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?
गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते. लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे साखरेमध्ये जितक्या कॅलरीज असतात तितक्याच गुळामध्ये असतात. जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढेल.

मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी गूळ घेण्यापूर्वी काळजी घ्यावी. कारण त्यात सुक्रोज आहे. जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. कोणत्याही प्रकारचे आजार टाळण्यासाठी नेहमी गुळाचे सेवन करा. गुळ साखरेपेक्षा चांगला आरोग्यदायी पर्याय आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

वजन कमी करण्यासाठी गूळ कसा वापरावा
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गूळ वापरत असाल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील इतर साहित्य देखील वापरू शकता. आपण गूळ आणि लिंबू वापरून डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता जे आपल्या चयापचय प्रक्रियेत सुधारणा करण्यास मदत करते.

Web Title: jaggery vs sugar which is best for your health gud or sugar for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.