एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या औषधी उपलब्ध होईना जळगावात रुग्णांची तक्रार : मुंबईहून औषधी साठा येण्यास विलंब

By admin | Published: August 10, 2016 10:03 PM2016-08-10T22:03:41+5:302016-08-10T22:03:41+5:30

जळगाव : जळगाव जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणार्‍या औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची काही रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मुंबई येथूनच औषधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

Jalgaon patients complaint against getting drugs of HIV-infected patients: delay in getting medicines from Mumbai | एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या औषधी उपलब्ध होईना जळगावात रुग्णांची तक्रार : मुंबईहून औषधी साठा येण्यास विलंब

एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या औषधी उपलब्ध होईना जळगावात रुग्णांची तक्रार : मुंबईहून औषधी साठा येण्यास विलंब

Next
गाव : जळगाव जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणार्‍या औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची काही रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मुंबई येथूनच औषधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
जळगाव जिल्‘ातील एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये औषधोपचार केले जातात. यामध्ये काही रुग्णांना झिडोकडाईन लॅमकोडाईन अर्थात झेड.एल. ही औषधी दिली जाते. एकदा औषधी सुरू झाली की ती शेवटपर्यंत कायम व विनाखंडित द्यावी लागते. अन्यथा विषाणूंची संख्या वाढत जाते व रुग्णांचा जीव धोक्यात येतो. असे असले तरी औषधीचा तुटवडा भासून ती मिळत नसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. तसेच बाहेर ही औषधी १३०० रुपयांना मिळते, त्यामुळे ते रुग्णांवर मोठा आर्थिक भार येतो तर काहिंना ते घेणेही शक्य होत नाही.
या बाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी याचा इन्कार करीत सांगितले की, एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जात आहे. कधी कधी औषधी येण्यास विलंब होतो, मात्र औषधी देणे बंद झाले असे नाही.

मुंबई येथूनच औषधी येईना....
केंद्र सरकारकडून राज्याला व मुंबई येथून जिल्हा रुग्णालयाला या औषधींचा पुरवठा केला जातो. यामध्ये कधी कधी अनियमितता येते. त्यामुळे रुग्णांना औषधी मिळत नाही. अशाच प्रकारे आतादेखील मुंबई येथून औषधी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे औषधी उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

७१७३ रुग्णांना औषधी
जळगाव जिल्‘ामध्ये ९५५३ एचआयव्ही रुग्णांची नोद आहे. यामध्ये ५०८५ पुरुष, ३८६१ स्त्रिया, १६ तृतीयपंथी, ३५१ पंधरा वर्षाच्या आतील मुले व २४० पंधरा वर्षांच्या आतील मुलींचा समावेश आहे. यापैकी ७१७३ उपचार घेणारे रुग्ण आहेत. यामध्ये ४०१६ पुरुष, २७६९ स्त्रिया, १० तृतीयपंथी, २३५ पंधरा वर्षाच्या आतील मुले व १४३ पंधरा वर्षांच्या आतील मुलींचा समावेश आहे.


एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जातात. औषधांचा तुटवडा नाही. केवळ मुंबई येथून काही औषधी येण्यास विलंब झाला तर त्यासाठी थांबावे लागते.
-डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Jalgaon patients complaint against getting drugs of HIV-infected patients: delay in getting medicines from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.