Weight Loss: जपानचे लोक या ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधी वाढत नाही लठ्ठपणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 09:49 AM2021-03-01T09:49:21+5:302021-03-01T10:11:50+5:30

Weight Loss Tips : वजन वाढण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्यानंतरही अनेकांचं वजन कमी होत नाही.

Japan has best trick to reduce fat with boiled water and a banana | Weight Loss: जपानचे लोक या ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधी वाढत नाही लठ्ठपणा...

Weight Loss: जपानचे लोक या ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधी वाढत नाही लठ्ठपणा...

googlenewsNext

Weight Loss Tips : वजन वाढण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्यानंतरही अनेकांचं वजन कमी होत नाही. घरगुती औषधापासून ते महागडं औषध वापरून हैराण झाल्यावर लोक लठ्ठपणा स्वीकारतात. मात्र, तुम्ही जपानचा एक सोपा आणि उत्तम फॉर्म्यूला वापरून लठ्ठपणापासून मुक्ती मिळवू शकता. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, लठ्ठपणा कमी करण्यासाठी जपानही ही पद्धत फार सोपी आहे. यासाठी तुम्हाला दिवसाची सुरूवात गरम पाण्यासोबत केळ खाऊन करावी लागेल. जपानमध्ये अनेक लोक सकाळी नाश्त्यात हीच डाएट घेतात. यालाच असा बनाना डाएट (asa banana diet) म्हटली जाते. चला जाणून घेऊ वजन कमी करण्याची जपानी पद्धत.... (हे पण वाचा : रात्री-अपरात्री अचानक जाग येते का?; पुन्हा शांत झोप लागण्यासाठी ८ उपयुक्त टिप्स)

केळी खाल्ल्याने मेटाबॉलिज्म सिस्टीम मजबूत राहण्यास मदत मिळते. सोबतच याने पचनतंत्र चांगलं होऊन पचनक्रियाही सुधारते. केळीमध्ये स्टार्स भरपूर असतं. ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण फार कमी असतं. केळीतील फायबर पोटाची समस्या होऊ देत नाही. 

भूक कमी करण्यास फायदेशीर - स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेट असलेली ही डाएट दिवसभर तुमच्या शरीरावर वाढत असलेल्या लठ्ठपणाला कमी करण्यास मदत करते. सकाळी नाश्त्यात केळीसोबत गरम पाणी प्यायल्याने दिवसभर पोट भरलेलं राहतं. याने तुम्ही भूक कमी लागते आणि तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खातही नाही. (हे पण वाचा : सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा....)

कसं कराल सेवन - सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. नंतर अर्ध्या तासाने दोन केळी खावीत. तुम्ही हवं तर तुमच्या भूकेनुसार केळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 

जपानी लोक इतरही काही फळं वजन कमी करण्याच्या दृष्टीने अधिक सेवन करतात. 

डाळिंब - डाळिंब एक जादुई फळ मानलं जातं. दररोज तुम्ही एक डाळिंब खाऊन केवळ वजन कमी कराल असं नाही तर शारीरिक कमजोरीही दूर करू शकता. मधुमेह पीडितांसाठी डाळिंब फारच फायदेशीर मानलं जातं.

सफरचंद - तसे तर सफरचंद लाल आणि हिरव्या रंगात सहजपणे मिळतात. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. लाल सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. याने पचनक्रिया सुधारते आणि सोबतच याने भूकही नियंत्रित होते.

आलू बुखारा  - वजन कमी करण्यासाठी याशिवाय दुसरा चांगलं उपाय नाही . आलू बुखाराचं सेवन करून तुमची इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होते आणि सोबतच सकाळी हे खाल्ल्याने दिवसभर भरपूर ऊर्जा मिळते.

स्ट्रॉबेरी - दररोज पाच ते सहा स्ट्रॉबेरी खाण्याने वजन तर कमी होतंच सोबतच याने इम्यूनिटी सुद्धा मजबूत होते. त्वचेसाठीही स्ट्रॉबेरी फार फायदेशीर आहे. 
 

Web Title: Japan has best trick to reduce fat with boiled water and a banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.