कोरोनानंतर 'या' देशात नव्या माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:29 PM2020-12-15T16:29:34+5:302020-12-15T16:49:25+5:30
तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. अजूनही अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या माहामारीत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जपानमध्ये बर्ड फ्लूने कहर केला आहे. तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत.
जपानच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ११ हजार पक्ष्यांना मारून त्यांना दफन केलं आहे. हा निर्णय दक्षिण पश्चिम जपानच्या शिगा प्रातांतील हिगाशीओमी शहरातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये अंड्यामुळे एवियन इन्फुंएंजा पसरल्यानंतर घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कागवा प्रांतातही बर्ड फ्लू चा प्रकोप पाहायला मिळत आहे. या आजाराच्या प्रसाराची सुरूवात मागच्या महिन्यात झाली होती.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्यामते (एफएओ) जपान आणि शेजारी दक्षिण कोरियामध्ये पसरलेली माहामारी जगभरातील कोंबड्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या दोन वेगवेगळ्या उच्च रोगजनक एवियन इन्फ्लूएंजा (एचपीएआई) यापैकी एक आहे. त्याचा जन्म सगळ्यात पहिल्यांदा युरोपमधील जंगली पक्ष्यांमध्ये झाला होता.
एफएओचे एक वरिष्ठ पशु आरोग्य अधिकारी मधूर ढींगरा यांनी सांगितले की, जपानमध्ये दिसून येणारा व्हायरस अनुवांशिंक रूपातून कोरियाई व्हायरस आणि युरोपमधील व्हायरसशी संबंधीत आहे. याचाच अर्थ असा की, सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स
एफएओने अफ्रिकी आरोग्य अधिकाऱ्यांना नुकतंच फ्लू व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. जपानमधील ४७ प्रातांमध्ये १० पेक्षा जास्त राज्यांत या माहामारीने कहर केला आहे. जवळपास ३ लाख पक्षी या आजाराने प्रभावीत आहेत. कोरोनाची लस दिल्यानंतर दिसू शकतात हे ५ साईड इफेक्टस; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला