काय खाऊन जपानी लोक जगतात 100 वर्ष? तुम्हालाही 'या' टिप्स फॉलो करून होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:37 AM2024-07-25T11:37:43+5:302024-07-25T11:38:47+5:30

जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील लोक आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतात ज्यामुळे त्यांना शक्ती मिळते आणि आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Japanese 80% diet rule can help you live a longer life, says longevity researcher | काय खाऊन जपानी लोक जगतात 100 वर्ष? तुम्हालाही 'या' टिप्स फॉलो करून होईल फायदा!

काय खाऊन जपानी लोक जगतात 100 वर्ष? तुम्हालाही 'या' टिप्स फॉलो करून होईल फायदा!

Food Habits for Longevity: जपानमधील लोक जास्त जीवन जगतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याचं नेमकं कारण काय आहे याकडे जास्त लोक लक्ष देत नाहीत. रिसर्चनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांना हार्ट अटॅक, कॅन्सर आणि हायपरटेंशनसारख्या समस्या होऊ लागल्या आहेत. भारतात सरासरी एका व्यक्तीचं आयुष्य हे 65 वर्ष आहे. जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. कमी वयातच कोलेस्ट्रोल आणि हायपरटेंशनच्या समस्या होतात. अशात तुम्हाला जर जास्त आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही जपानी लोकांच्या काही सवयी फॉलो करू शकता. जपानी लोकांच्या काही चांगल्या सवयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शुगर ड्रिंक्स आणि स्टार्च फूचं सेवन कमी

साखर, फळ आणि बटाटे यांमध्ये नॅचरल शुगर आणि स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. जे लोक ग्लूकोज योग्यपणे पचवू शकत नाहीत त्यांनी हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तुम्हाला जास्त आयुष्य जगायचं असेल तर शुगर ड्रिंक्स आणि जास्त स्टार्च असलेल्या फूड्सचं सेवन टाळलं पाहिजे.

मासे आणि सी फूड्स

जपानमधील जास्तीत जास्त लोक मासे आणि सी फूड्स खूप खातात. मासे आणि इतरही अनेक सी फूड्समध्ये पॉलीअनसॅचुरेटेज फॅटी अ‍ॅसिड असतं जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतं. त्याशिवाय या गोष्टींमध्ये प्रोटीन आणि ओमेगा फॅटी अ‍ॅसिडही भरपूर असतं. याने वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होतो.

ग्रीन टी

केवळ भारतातच नाही तर जपानमधील लोकही खूप चहा पितात. पण येथील लोक दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. यात साखर नसते. ग्रीन टीमध्ये अॅंटी-एजिंग गुण असतात ज्यामुळे तुम्ही नेहमी तरूण आणि निरोगी राहता. 

सोयाबीन फायदेशीर

जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. यात भरपूर प्रोटीन असतं. सोयाबीनमध्ये असलेलं आयसोफ्लेवोन्स अ‍ॅंटी कार्डियोवस्कुलर आणि अ‍ॅंटी कॅन्सर असतं ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. जपानी लोक भरपूर सोयाबीन खातात.

मिशो सूप

मिशो सूप फर्मेटेड सोयापासून बनवलं जातं. याची खास बाब म्हणजे यातून तुम्हाला प्रोबिओटिक तत्व भरपूर मिळतात. याच्या सेवनाने पोट आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.

रताळे

तुम्ही हे कंदमूळ नक्कीच पाहिलं असेल आणि अनेकदा खाल्लंही असेल. डॉक्टरांनुसार, यात भरपूर प्रमाणात anthocyanin नावाचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. तसेच यात अ‍ॅंटी-कॅन्सर, अ‍ॅंटी डायबिटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी मायक्रोबियल आणि अ‍ॅंटी-ओबेसिटी गुण असतात.

डायकोन मूळा

सामान्य मुळ्यापेक्षा हा मूळा जरा वेगळा असतो. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याच्या नियमित सेवनाने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. इम्यून पॉवर मजबूत झाल्याने तुम्हाला संक्रमण आणि आजारांसोबत लढण्याची शक्ती मिळते.

समुद्री शेवाळ

समुद्री शेवाळात व्हिटॅमिन ए, सी, आणि ई, कॅरोटीनॉयड आणि फ्लेवोनोइड सारखे अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट असतात. हे ऑक्सिडेंट तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतात. त्याशिवाय यात सगळे मिनरल्स आढळतात जे शरीराला चांगलं काम करण्यासाठी गरजेचे असतात.
 

Web Title: Japanese 80% diet rule can help you live a longer life, says longevity researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.