डोकेदुखी तीन मिनिटात दूर करण्यासाठी वापरा ही जपानी थेरपी, जाणून घ्या पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:47 AM2018-08-22T11:47:57+5:302018-08-22T11:48:52+5:30
डोकेदुखी दूर करण्यासाठी जपानी मसाज थेरपी खूप फायदेशीर मानली जाते. चला जाणून घेऊ काही अशाच थेरपी ज्याने डोकेदुखी दूर केली जाऊ शकते.
(Image Credit : chiropractorkissimmee.com)
अनेकदा तणाव आणि चिंता किंवा आणखीही कोणत्या कारणामुळे डोकेदु:खीची समस्या होते. ही डोकेदुखी घालवण्यासाठी अनेकजण कशाचाही विचार न करता पेनकिलर घेतात जी शरीरासाठी हानिकारक आहे. पेनकिलरतं अधिक सेवन केल्यास तुम्हाला हृदय आणि मेंदुसंबंधी समस्या होऊ शकतात. अशा सामान्य वेदनेपासून आणि घरगुती उपायांनी आणि थेरपींनी सुटका मिळवली जाऊ शकते. डोकेदुखी दूर करण्यासाठी जपानी मसाज थेरपी खूप फायदेशीर मानली जाते. चला जाणून घेऊ काही अशाच थेरपी ज्याने डोकेदुखी दूर केली जाऊ शकते.
काय आहे जपानी थेरपी?
जपानमध्ये वेदनेपासून सुटका मिळण्यासाठी शियात्सु थेरपीचा वापर केला जातो. शियात्सुचा अर्थ मालिश द्वारे स्वत: केला जाणारा उपचार. शियात्सुच्या माध्यमातून केवळ डोकेदुखीच नाही तर तणाव आणि डिप्रेशनमधूनही सुटका मिळवली जाऊ शकते. शियात्सु थेरपी ही एकप्रकारची फिंगर मसाज थेरपी आहे. ज्यात बोटांच्या माध्यमातून काही विशेष पॉईंट दाबून उपचार केले जातात.
डोकेदुखी दूर करण्यासाठी थेरपी १
जर तुमचं डोकं जोरात दुखत असेल तर हा त्रास दूर करण्यासाठी बोटांच्या माध्यमातून कपाळावर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. याप्रकारे मसाज केल्यास नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आणि नसांमधील तणाव कमी होतो. याने डोकेदुखी दूर होते.
डोकेदुखी दूर करण्यासाठी थेरपी २
डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी या थेरपीचीही उपयोग केला जाऊ शकतो. ही थेरपी करण्याआधी हात चांगले स्वच्छ धुवा. डोकेदुखी होत असेल तेव्हा बोटांच्या मदतीने आय-ब्रोच्या मधल्या जागेला दाबत मसाज करा. जपानी शियात्सु थेरपीनुसार, या जागेतून शरीराच्या वायटल एनर्जीचा प्रवाह होतो. त्यामुळे जवळपास एक मिनिट या पॉईंटवर दाबून ठेवल्यास ते अॅक्टीवेट होतात आणि डोकेदुखी कमी होते.
डोकेदुखी दूर करण्यासाठी थेरपी ३
जर तुमचं डोकं दुखत असेल तर ही तिसरी थेरपीही तुम्ही करु शकता. यासाठी सर्वातआधी डोळे बंद करा आणि आय-ब्रोपासून अर्ध्या इंचावर असलेल्या जागेवर दोन्हीकडून सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. या जागेवर मसाज केल्यास डोक्यात रक्तप्रवाह वेगाने होतो आणि डोकेदुखीपासून सुटका होते.