Heart attack: चेहऱ्याच्या 'या' भागातील दुखणे असु शकते हार्ट अटॅक येण्याचे लक्षण, त्वरित व्हा सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:26 PM2022-03-25T15:26:22+5:302022-03-25T15:30:02+5:30
जबडा दुखणे हे देखील सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणं अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये याविषयी जाणून घेऊया.
आपलं हृदय धडधडत राहील तोपर्यंत आपण जगाल. हृदयाची कोणतीही समस्या तुमचं आयुष्य कमी करू शकते. हल्ली ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची समस्या कमी वयातच लोकांमध्ये वाढत आहे. हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करतं. अनेक वेळा खराब जीवनशैली, अनियमित खाणं, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा नसणं, लठ्ठपणा, अति धूम्रपान, मद्यपान, तणाव, चिंता या कारणांमुळं हृदयाचे विकार होण्याचा (Cardiovascular Diseases) धोका वाढतो.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, जबडा दुखणे हे देखील सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणं अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये याविषयी जाणून घेऊया.
जबडा दुखणे
जबड्याच्या मागच्या भागात वेदना जाणवत असतील तर हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. यामध्ये वेदना जबड्यापासून सुरू होऊन मानेपर्यंत जातात. ही वेदना खूप अचानक होते. तुम्हाला याची लक्षणे आधीच दिसत नाहीत.
हातात मुंग्या येणे
हाताला वेदना जाणवणं किंवा हाताला मुंग्या येणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण आहे. ही वेदना छाती आणि मानेपर्यंत वाढू शकते.
अचानक घाम येणे
जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊ लागला तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यावेळी काळजी घेऊन घाम कशामुळे येतोय याची खात्री करून गरज असल्यास ताबडतोब रुग्णालयात जा.
धाप लागणे आणि चक्कर येणं
पायऱ्या चढल्यानंतर जास्त धाप लागत असेल तर आपले हृदय नीट काम करत नाही, असे समजावे. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
ढेकर येणे आणि ओटीपोटात दुखणे
पोटाच्या अनेक समस्या हार्ट अटॅकचे लक्षण असू शकतात. ढेकर येणं, पोटदुखी ही देखील सौम्य हृदयविकाराची लक्षणे आहेत. नेहमीपेक्षा वेगळी अशी काही लक्षणं जाणवत असेल तर खबरदारी घ्या.सिडीटी