वजन कमी करणं ते इम्यूनिटी वाढवणं कितीतरी फायदे देतं जिऱ्याचं पाणी, कसं कराल तयार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:32 AM2024-03-27T09:32:21+5:302024-03-27T09:32:47+5:30
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं खास पाणी प्यायले तर वजन कमी करण्यापासून पचन तंत्र चांगलं ठेवण्यास मदत मिळू शकते. चला जाणून घेऊ याचे फायदे...
Jeera Water Benefits: जिऱ्याचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. जिऱ्याचा तडका तर अनेकांना रोज हवा असतो. सोबतच जिऱ्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण फार जास्त कुणाला माहीत नसतात. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्व असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात. अशात जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं खास पाणी प्यायले तर वजन कमी करण्यापासून पचन तंत्र चांगलं ठेवण्यास मदत मिळू शकते. चला जाणून घेऊ याचे फायदे...
1) पचनक्रिया
रोज सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्याल तर पचन चांगलं होण्यास मदत मिळते. कारण यात असे काही तत्व असतात जे डायजेस्टिव एंझाइम्सचं प्रोडक्शन वेगाने करतं.
2) वजन कमी करा
आजच्या या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या खाण्या-पिण्याकडे फारचं लक्ष देत नाहीत. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे त्याचं वजन वाढू लागतं. अशात जर वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यावे.
3) सूज कमी करा
जिऱ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनाने शरीरातील सूज कमी करण्यास मदत मिळते. जिऱ्यामध्ये अॅंटी-इफ्लेमेटरी तत्व असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
4) ब्लड शुगर
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन करू शकता. जिऱ्यात हाय फायबर इंग्रीडिएंट आणि पोषक तत्व असतात जे इन्सुलिन लेव्हल नॅचरल रेगुलेट करण्यास मदत करतात.
5) इम्यूनिटी
वातावरणात बदल होत आहे त्यामुळे इम्यूनिटी मजबूत ठेवणं गरजेचं आहे. इम्यूनिटी मजबूत असेल तर अनेक आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. रोज सकाळी जिऱ्याचं पाणी प्याल तर तुमची इम्यूनिटी मजबूत होऊ शकते.
असं तयार करा पाणी
एका भाड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये दोन चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून चांगले उकळून घ्या. यानंतर हे पाणी कप घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेल्यास फायदेशीर ठरेल.
आणखी एक पद्धत
झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका. हे पाणी रात्रभर असंच ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी पिण्यासाठी जिरे गाळून घ्या. पाण्याचं सेवन करा आणि नंतर जिरे चाऊन खाऊ शकता.