'या' ७१ वर्षीय महिलेला आयुष्यात कधीच जाणवल्या नाही वेदना, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 10:27 AM2019-03-30T10:27:09+5:302019-03-30T10:28:22+5:30
प्रत्येक व्यक्तीला कधी कधी इजा झाल्यावर वेदना होतातच. पण एक ७१ वर्षीय अशी महिला आहे जिला आयुष्यात कधी वेदना नाही झाल्या.
(Image Credit : MyHealthyClick)
प्रत्येक व्यक्तीला कधी कधी इजा झाल्यावर वेदना होतातच. पण एक ७१ वर्षीय अशी महिला आहे जिला आयुष्यात कधी वेदना नाही झाल्या. जो कॅमेरॉन असं या महिलेचं नाव असून त्यांना सांगण्यात आलं होतं की, बाळाच्या जन्मावेळी फार वेदना होतील, पण अनेक तास उलटून गेल्यावरही त्यांना काहीच झालं नाही. त्यांना काहीच जाणवत नव्हतं. हैराण करणारी ही बाब आहे की, यावेळी त्यांना गुंगीचं कोणतही औषध देण्यात आलं नव्हतं. कॅमेरॉन त्या घटनेची आठवण काढत सांगतात की, 'मला हे तर जाणवत होतं की, माझ्या शरीरात काहीतरी बदल होत आहे, पण मला कोणत्याही प्रकारची वेदना होत नव्हती. मला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होतं'.
जो कॅमेरॉन यांना संपूर्ण शरीरात नाही पण शरीराच्या काही भागांमध्ये वेदना होतात. आता वैज्ञानिकांना याचं कारण कळालं. गुरूवारी द ब्रिटीश जर्नल ऑफ एनेस्थेशियामध्ये प्रकाशित वैज्ञानिकांनी कॅमेरॉन यांच्या या स्थितीचं कारण एका अज्ञात जीनमध्ये परिवर्तन सांगितलं आहे. वैज्ञनिकांनी आशा आहे की, या शोधामुळे कॅमेरॉनवर उपचार करण्यास मदत मिळेल. पण त्यांचं हेही म्हणणं आहे की, म्यूटेशन या गोष्टीशीही जुळलेलं असू शकतं की, कॅमेरॉनला आयुष्यभर थोडी चिंता आणि भीती का जाणवली, तसेच त्यांचं शरीर कोणत्याही परिस्थितीतून लगेच पूर्ववत कसं होतं?
वेगवेगळे वाद-विवाद सुरू असताना या रिसर्च समोर आला. यात वेदनेवर उपचार कसा केला जावा यावर चर्चा सुरू होती. गुरूवारी न्यू यॉर्क स्टेटने ओपीऑइड ऑक्सिटोसिनचे निर्माता सॅक्लर फॅमिली विरोधात एक केस ठोकली. येलचे न्यूरोलॉजिस्ट स्टीफन जी वॅक्समॅन यांच्यानुसार, आपल्याला क्रॉनिक पेनसाठी फार कमी गुंगी असलेल्या पर्यायाची गरज असण्याचा हा संकेत होता.
कॅमेरॉनच्या ज्या स्तिथींमुळे वैज्ञानिक त्यांच्या जीनच्या तपासणी तयार झाले होते, त्याची सुरूवात पाच वर्षांआधी झाली होती. त्या पतीसोबत स्कॉटलॅंडमध्ये एक आनंदी आणि सामान्य जीवन जगत होत्या. एका हाताच्या ऑपरेशननंतर डॉक्टर हैराण झाले होते, या महिलेला कोणत्याही प्रकारची वेदना होत नाहीये आणि तिला पेनकिलरही नकोय. त्यानंतर कॅमेरॉन यांना कीह प्रश्न विचारण्यात आले आणि धक्कादायक बाब समोर आली.
६५ व्या वयात त्यांची हिप म्हणजेच पृष्ठभाग रिप्लेस करण्याची गरज होती. कारण त्यांना काहीच जाणवत नव्हतं. त्यांना ही समस्या कधी सुरू झाली याची त्यांनाही कल्पना नव्हती. इतकेच काय तर भाजल्यावर, कापल्यावरही कॅमेरॉन यांना कोणतीही वेदना होत नव्हती. कॅमेरॉन यांना काही चूक झाल्याचं तर कळत होतं. म्हणजे त्यांनी शरीराचा अवयव जळत असेल तर त्याचा वास येत होता आणि त्यानंतर रक्त दिसत होतं.
शेवटी कॅमेरॉन यांच्या डॉक्टरांना ते मिळालंच ज्याचा ते शोध घेत होते. डॉक्टर त्या जीनचा शोध घेत होते, ज्याला वैज्ञानिक भाषेत FAAH-OUT म्हणतात. आपल्या सर्वांमध्ये हा जीन असतो. पण कॅमेरॉन यांच्यात डिलिशन आहे, जे जीनच्या फ्रन्टला रिमुव्ह करतं. कॅमेरॉन यांच्या रक्ताची तपासणी केल्यावर हे समोर आलं.
वैज्ञानिक कॅमेरॉनच्या असाधारण रूपामुळे तिला अजिबात चिंता नसल्याने चिंतेत आहेत एंग्जायटी डिसऑर्डर प्रश्नावलीत कॅमेरॉनने २१ पैकी ० स्कोर केला. इतकेच नाही तर कॅमेरॉन यांना हेही आठवत नाही की, त्यांना कधी डिप्रेशन होतं किंवा भीती वाटली. अभ्यासकांनी सांगितले की, आता ते FAAH-OUT वर फोकस करणार आहेत आणि हे जीन कसं काम करतात हे बघणार आहेत.