लहान बाळांसाठी जॉन्सन बेबी पावडर सुरक्षितच; अस्बेस्टॉस नसल्याचे तपासणीत निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:51 PM2019-12-13T17:51:38+5:302019-12-13T17:53:28+5:30
जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर इंकने (द कंपनी) जॉन्सन बेबी पावडर सुरक्षित आणि अस्बेस्टॉसमुक्त असल्याला आज परत एकदा निर्वाळा दिला आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर इंकने (द कंपनी) जॉन्सन बेबी पावडर सुरक्षित आणि अस्बेस्टॉसमुक्त असल्याला आज परत एकदा निर्वाळा दिला आहे. युनायटेड स्टेट्स फुड्स अँड ड्रग्ज अडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) यापूर्वी जॉन्सन बेबी पावडरच्या एका बाटलीमध्ये अस्बेस्टॉसचे कण (0.00002 टक्क्यापेक्षा जास्त नाही) सापडल्याचा अहवाल सादर केला होता, या अहवालाची सर्वसमावेशक तपासणी केल्यानंतर कंपनीने जॉन्सन बेबी पावडर सुरक्षित व अस्बेस्टॉसमुक्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.
थर्ड पार्टी प्रयोगशाळांनी केलेल्या चाचणीमध्ये एफडीएची कंत्राटदार प्रयोगशाळा एएमए अनालिटिकल सर्व्हिसेस इंकने (एएमए) तपासलेल्या एकाही बाटलीमध्ये तसेच ती बाटली ज्या अंतिम मालापासून तयार करण्यात आली होती, त्याच्या संपादित नमुन्यांमध्येही अस्बेस्टॉस नसल्याचे दर्शवण्यात आले आहे. एफीडएच्या अहवालाच्या निष्कर्षात चाचणीसाठी वापरण्यात आलेला नमुना दूषित असल्यामुळे आणि/किंवा एएमए प्रयोगशाळेत विश्लेषकांची चूक झाल्यामुळे तसा नकारात्मक परिणाम समोर आल्याचे कंपनीने मांडलेले आहे. पण पुन्हा घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये जॉन्सन बेबी पावडर वापरण्यास पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा कंपनीनं केलेला आहे.
कंपनीने नमूद केले आहे, की ‘आमची पावडर सुरक्षित आणि अस्बेस्टॉसमुक्त आहे आणि या 150पेक्षा जास्त चाचण्या व आम्ही नियमितपणे करत असलेल्या चाचण्या पावडरसंबंधी उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेची खात्री देणाऱ्या आहेत. गेली 40 वर्ष आम्ही स्वतंत्र प्रयोगशाळेतून या चाचण्या करत आहोत, त्यांच्या निष्कर्षात सातत्यपूर्णता असल्याचंही समोर आलं आहे. दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी एएमएने तपासलेल्या आणि जॉन्सनने परत मागवलेल्या बेबी पावडरमधील तसेच त्याआधीच्या तीन लॉटमधील व त्यानंतर उत्पादन झालेल्या तीन लॉटमधील बाटलीतील नमुना वापरत त्यांची चार प्रकारे पुन्हा तपासणी केली, त्यासाठी एकूण 150 चाचण्या घेण्यात आल्या. सर्व चाचण्यांमध्ये आमची पावडर अस्बेस्टॉसमुक्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
या चाचण्यांपैकी 63 चाचण्यांचे निष्कर्ष 29 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आणि कंपनीने आज त्यानंतरच्या 92 चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. तपासणीसाठी वापरण्यात आलेल्या नमुन्याची चाचणी घेत असताना एएमए प्रयोगशाळेतल्या विश्लेषकांकडून चूक झाल्यामुळेच आमच्या उत्पादनाबाबत नकारात्मक निकाल देण्यात आला. एएमएने चाचणी घेतलेल्या तीनपैकी दोन सदोष नमुन्यांमध्ये त्याच बाटलीतील नमुन्यांचा थर्ड पार्टी चाचण्यांशी तुलना करता सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. एएमएच्या चाचणी निष्कर्षांची कंपनीतर्फे करण्यात आलेली तपासणी पूर्ण झालेली आहे.
कंपनीने आपले निष्कर्ष एफडीएकडे दाखल केले असून, ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी एफडीएबरोबर यापुढेही काम करण्यास व आवश्यक पाठिंबा देण्यास तयार आहे. 133 वर्षांपासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपन्यांचे कुटुंब ग्राहकांचे स्वास्थ्य आणि गरजांना प्राधान्य देत असून, यापुढेही आम्ही ते करत राहू. कंपनीने सर्व 155 चाचण्यांचे निष्कर्ष, एफडीएकडून मिळालेला एएमएचा संपूर्ण अहवाल आणि आपल्या तपासणीचे निष्कर्ष हे सकारात्मक असून, जॉन्सन बेबी पावडर ही बाळासाठी वापरण्यास सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.