'या' गोष्टीमुळे डायबिटीजच्या रूग्णांमध्ये शुगर वाढण्याचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:05 AM2019-03-18T10:05:03+5:302019-03-18T10:05:09+5:30
डायबिटीजचे असे रुग्ण जे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करतात, त्यांना ऑपरेशननंतर शुगर स्तर वाढण्याचा धोका अधिक असतो.
डायबिटीजचे असे रुग्ण जे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करतात, त्यांना ऑपरेशननंतर शुगर स्तर वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे इन्फेक्शन सोबतच इतरही वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
या रिसर्चनुसार, अशा स्थितीला हायपरग्लायसीमिया म्हटले जाते. अभ्यासकांनी सांगितले की, इन्सुलिनवर निर्भर राहणाऱ्या सामान्य लोकांच्या तुलनेत हायपरग्लायसीमिया म्हणजे हाय शुगर लेव्हलचा धोका पाच टक्के अधिक वाढतो. अमेरिकेच्या हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे डॉक्टर आणि अभ्यासक ब्रॅडफोर्ड वाडल म्हणाले की, 'जर रूग्णाला डायबिटीज असेल आणि तो इन्सुलिनवर अवलंबून असेल तर त्यांची शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्याची फार गरज असते. असे न झाल्यास त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते.
या रिसर्चसाठी अभ्यासकांच्या गटाने ७७३ अशा पुरूष आणि महिलांचे मेडिकल चार्ट रिव्ह्यू केले, ज्यांनी २०११ ते २०१६ दरम्यान हिप किंवा गुडघ्याची सर्जरी केली होती. त्यातील ४३७ रूग्ण इन्सुलिनवर निर्भर होते. तर ३३६ असे होते ज्यांना डायबिटीज तर होता पण तो कंट्रोल करण्यासाठी त्यांना इन्सुलिनची गरज नव्हती.
ज्या रूग्णांना डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनची गरज पडत होती, त्यांच्यात सर्जरीनंतर शुगर स्तर वाढण्याचा धोका अधिक होता. मात्र ऑपरेशननंतर हाय शुगर लेव्हलचा धोका असूनही ऑपरेशननंतर होणाऱ्या जॉइंटसंबंधी इन्फेक्शनबाबत दोन्ही गटांमध्ये काही खास फरक बघायला मिळाला नाही.