पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्या 'हे' खास ज्युसेस, सडपातळ कंबरेसाठी रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 01:07 PM2022-04-26T13:07:20+5:302022-04-26T13:14:40+5:30

आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.

juices to reduce your belly fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्या 'हे' खास ज्युसेस, सडपातळ कंबरेसाठी रामबाण उपाय

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्या 'हे' खास ज्युसेस, सडपातळ कंबरेसाठी रामबाण उपाय

googlenewsNext

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजार जडतात. यामध्ये लठ्ठपणा एक अशी समस्या आहे जी आजकाल तरूणांना देखील सतावतेय. अनेकवेळा व्यायाम करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.

डाळिंबाचा ज्यूस
डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यामध्ये झिंक, पोटॅशियम, फायबर, आयर्न, ओमेगा-6 असे अनेक पोषक घटक असतात. हे घटक तुम्ही करत असलेल्या व्यायामाचा प्रभाव वाढवण्यात मदत करू शकतात, असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे.

हिरव्या भाज्यांचा ज्यूस
हिरव्या भाज्या जसं की आवळा, पालक, ब्रोकोली, कारलं यांचा ज्यूस घरीच बनवून पिऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वं आणि खनिजं असततात, जे तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याच वेळी, त्यांच्यामध्ये असलेले फायबर तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतं. जेणेकरून तुम्ही काही अनहेल्दी खात नाही.

आलं आणि लिंबाचा ज्यूस
आलं आणि लिंबू दोन्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात. यासोबतच ते शरीरातील मेटाबॉलिझ्म रेट देखील वाढवतं. त्यामुळे शरीरात अन्न चांगलं पचतं आणि चरबी तयार होत नाही. याच्या दररोज सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Web Title: juices to reduce your belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.