फक्त हुशार आणि मेहनती आहात? मग तुमचं करिअर ढपलंच समजा..

By admin | Published: May 11, 2017 05:58 PM2017-05-11T17:58:34+5:302017-05-11T18:13:38+5:30

कौशल्य आणि मेहनत यांच्या जोरावर फक्त १५% यश मिळतं, यशस्वी व्हायचं असेल तर हवेत ८५% सॉफ्ट स्किल्स!

Just smart and hard work? Then think about your career. | फक्त हुशार आणि मेहनती आहात? मग तुमचं करिअर ढपलंच समजा..

फक्त हुशार आणि मेहनती आहात? मग तुमचं करिअर ढपलंच समजा..

Next

- चिन्मय लेले

आपण फार हुशार आहोत, आपलं काम आपल्याला चोख येतं, आपल्या कामातलं तांत्रिक आणि अन्य कौशल्यं आपल्याला उत्तम येतात म्हणून आपण करिअरमध्ये यशस्वीच होवू आणि सगळ्यात टॉप पोझिशनवर पोहचू असं वाटतं तुम्हाला? वाटत असेल, तर चुकताय तुम्ही! हे सारं असूनही तुमच्या करिअरची गाडी सायडिंगला लागून तुमच्या करिअरचा खटारा होवू शकतो. हार्वर्ड विद्यापीठ, कार्नेज फाऊण्डेशन, स्टॅण्डफर्ड रीसर्च सेण्टर यांनी केलेला एक अभ्यास म्हणतो की नोकरीत मिळणारं यश मुख्यत: म्हणजे ८५ % प्रमाणात सॉफ्ट स्किल्स आणि तुम्ही माणसांशी कसं वागता यावर अवलंबून असतं. बाकी १५% यश तुमची कौशल्य आणि तुमचं कामातलं नैपूण्य आणि तुमची मेहनत यावर अवलंबून असतं!
विश्वास नाही ना बसत या अभ्यासावर? मात्र १९१८ मध्ये स्थापन झालेलं कार्नेज फाऊण्डेशन गेली किमान १०० वर्षे माणसांच्या सॉफ्ट स्किल्सचा आणि त्यांच्या यशाचा अभ्यास करतं आहे. आणि अलिकडे तर तमाम बड्या कंपन्यातील मनुष्यबळाचा अभ्यास करुन त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. ज्या माणसांकडे कामाची कौशल्यं तुलेनंनं कमी, नैपूण्य कमी पण मेहनत आणि लोकांशी जमवून घेण्याची कला, सॉफ्ट स्किल्सही इतरांशी उत्तम संवाद हे गूण असतात ती माणसं गुणी आणि हुशार माणसांपेक्षा पुढे निघून गेलेली दिसतात. सोबत भावनिक बुद्धिमत्ता हवी. स्वत:सह इतरांच्या भावनांची जपणूक करता यायला हवी.
आणि त्यासह हवीत आणखी काही स्किल्स. तरच तुमच्या करिअरची फ्लाईट टेकआॅफ करेल, नाहीतर टायर फंक्चर, हवा गुल व्हायला वेळ लागणार नाही.
म्हणून काही गोष्टी शिकून घ्या, आवर्जुन कराच..

 



१) आपल्या कल्पना थेट स्पष्ट शब्दांत मांडायला शिका. लाजू नका.
२) आत्मविश्वासानं बोला. असंही करता येईल, तसंही करू असं बोलू नका. त्यापेक्षा थेट मला असं असं करावंसं वाटतं, मी अमूक करतो असं ठाम बोला. ते करा.
३) ग्रुपमध्ये काम करायला शिका. मात्र स्वत:ची वेगळी ओळख त्यातही दिसेल असा प्रयत्न करा. तो करताना त्यात टीमचं हीत दिसलं पाहिजे, व्यक्तिगत हीत नव्हे.
४) कंपनीचं आर्थिक वास्तव नक्की काय आहे हे समजून घ्या, पैसा कुठून येतो, येवू शकतो याचं आपलं आकलन पक्कं पाहिजे.
५) समस्या असेल, अडचणी आल्या तर त्यापासून पळू नका. उलट ती संधी आहे असं समजून पुढाकार घ्या, माहिती गोळा करा. त्यातून सोल्यूशन द्या. तुमच्या कामापेक्षा हे काम जास्त बोलकं ठरेल.
६) पुढाकार घ्या, कल्पना सुचवा, संधी कुठली हे ओळखा, प्रो अ‍ॅक्टिव्ह व्हा, म्हणजेच स्वत:हून स्वत:ला हवं तेच काम अंगावर घ्या. ते तडीस न्या.
७) गोष्टी मेहनतीनं करा, पण स्मार्टपणे करा. कामं वाटून द्या, इतरांकडून करुन घ्या, स्वत:चं काम बॉसच्या नजरेत येईल इतपत ठळक करा. काम उत्तमच करायचं आहे, पण आपलं काम दिसणं महत्वाचं आहे, हे ही विसरु नका.
८) उत्तम इमेल लिहायला शिका. कामाविषयीच्या परिणामकारक आणि प्रभावी इमेल लिहिणं हे एक स्किल आहे.
९) टाइम मॅनेजमेण्ट शिकून घ्या. प्रायॉरिटी ठरवा. डेडलाइनच्या आत काम संपवा.
१०) सगळ्यात महत्वाचं आॅफिसमध्ये, कुणाही कलीगच्या संदर्भात वाईट बोलू नका, कागाळ्या करू नका. दुसऱ्याला मेसेज करताना काळजी घ्या. स्पर्धा असलीच तरी व्यक्त करू नका. शांतपणे काम करा. आपल्याविरुद्ध रेकॉर्ड क्रिएट होईल असं वागू नका.

Web Title: Just smart and hard work? Then think about your career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.