कपड्यांना ठेवा फ्रेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 12:17 PM2017-01-17T12:17:39+5:302017-01-17T12:20:06+5:30

दिवसभर धावपळ करून आपल्या शरीराच्या घामाचा वास कपड्यांना येत असतो. यामुळे आपले इंप्रेशन बॅडही पडते. आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपले कपडेही फे्रश असणे आवश्यक आहे. यासाठी खाली काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे कपडे फ्रेश राहण्यास मदत होईल.

Keep the clothes fresh! | कपड्यांना ठेवा फ्रेश !

कपड्यांना ठेवा फ्रेश !

googlenewsNext
वसभर धावपळ करून आपल्या शरीराच्या घामाचा वास कपड्यांना येत असतो. यामुळे आपले इंप्रेशन बॅडही पडते. आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपले कपडेही फे्रश असणे आवश्यक आहे. यासाठी खाली काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे कपडे फ्रेश राहण्यास मदत होईल. 
* ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवतो ती जागा स्वच्छ व चांगली असावी, कारण खराब ठिकाणी कपडे ठेवल्याने कपड्यांना खराब वास येतो. कपडे ठेवण्यापूर्वी आपले कपाट स्वच्छ केल्यास कपड्यांना खराब वास  येत नाही.  

* कपडे ओलसर असतील तर ते कपाटात ठेवू नका. त्यांना हॅँगरवर लटकवा तसेच दोन ओले कपडे जवळजवळ लटकवू नका. 

* कपाटात कपडे ठेवताना त्याठिकाणी सुंगधी साबणही ठेवा. शिवाय कपाटात रुम फ्रेशनर वापरल्यास कपड्यांना खराब वास येणार नाही. 

* आपल्या कपड्यांना रोजच धुवा, कारण एक दिवसही वापरले तरी शरीराचा घाम त्यांना  लागतोच. फक्त जीन्स शक्यतो रोज धुवूू नका. याने ती खराब होऊ शकते. 

* कपडे धुण्याचे सुगंधी साबण किंवा पावडर वापरा. याने कपडे फ्रेशही राहतील. 

* कपाट नेहमी बंद असल्याने त्यात कोंदट वास येतो. म्हणून दिवसातून काही वेळ कपाटाला उघडे ठेवून हवा खेळती राहू द्या. 

Web Title: Keep the clothes fresh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.